अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील कै.बेथुजी गुरूजी प्रतिष्ठाण आणि मराठवाडा जनता विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गोविंदभाई श्रॉफ यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे माजी अध्यक्ष भागवतराव कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शिरीष खेडगीकर हे होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले.महेश राडीकर,बाबुराव बाभुळगावकर यांच्याहस्ते प्रतिष्ठाणचे प्रवर्तक सुरेंद्रनाना खेडगीकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.शिरीष खेडगीकर यांनी गोविंदभाई श्रॉफ यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना करून दिली.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवतराव कांबळे यांनी अध्यक्षीय समारोप केला.यावेळी प्राचार्य रमण सोनवळकर,जगदीश जाजू यांचेही समायोचित भाषण झाले.कार्यक्रमाला उल्हास पांडे,अॅड.सुधाकर पांडे,अरूण दैठणकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांनी केले.श्रीधर काळेगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्देशित केलेल्या सुचनांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.