अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
विश्व वारकरी सेनेची अंबाजोगाई कार्यकारीणी नुकतीच जाहिर करण्यात आली.नूतन पदाधिकार्यांचा यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महंत ह.भ.प.किसन महाराज पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सुनिल लोमटे (परळी),ह.भ.प. शहाजी सिरसाट हे उपस्थित होते.प्रारंभी कै.ह.भ.प.माधवबुवा शास्त्री व कै.आत्माराम चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापुजन व पुष्प अर्पण करण्यात आले.त्यानंतर विश्व वारकरी सेनेची तालुका कार्यकारीणी जाहिर करण्यात आली.तालुकाध्यक्ष म्हणून आवूबाई जाधव,उपाध्यक्षपदी मिराबाई यादव तर सदस्य म्हणून राधाबाई नरारे चंद्रभागाताई गिरी,कमलताई संगापुडे,अनिताताई भगत,विमलताई ठोंबरे या पदाधिकार्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना प्रा.सुनिल लोमटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर ह.भ.प.शहाजी सिरसाट यांनी विश्व वारकरी सेनेने समाजातील अडीअडचणी व अधंश्रद्धा दुर कशा होतील ? याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.अध्यक्षीय समारोप करताना ह.भ.प.किसन महाराज पवार यांनी सद्गुरू ह.भ.प.बंकट स्वामी महाराज व त्यांचे शिष्य रामदास बुवा मनसुख,तनपुरे महाराज आणि प्रकाश बोधले महाराज यांच्या कार्याची आठवण करून दिली.निर्व्यसनी समाज निर्माण करण्याच्या कामी प्रयत्न झाले तर धर्माचे अधःपतन होणार नाही.याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयोजक प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर म्हणाले की,हिंदु संस्कृती ही जगात महान आहे.तर मराठवाडा ही संतांची भूमि आहे.या ठिकाणी विश्व वारकरी सेनेच्या माध्यमातून विधायक कार्य होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी वसंतराव हावळे,बालाजी सलगर,माणिक जाधव,बालाप्रसाद रूणवाल,शमी पठाण आदींना मान्यवरांनी सन्मानित केले.सदरील कार्यक्रमाचे आयोजन प्रा.राम चौधरी यांनी आपल्या वडीलांच्या पुण्यतिथी निमित्त केले होते.हा कार्यक्रम विश्व वारकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.सविताताई खेडकर,शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.कार्यक्रमाची सांगता वसंतराव हावळे यांच्या गायनाने झाली.कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्देशित केलेल्या सुचनांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.