पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार – संभाजी ब्रिगेडचा इशारा

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
बीडमध्ये पाटबंधारे विभागात पेटवून घेतलेल्या शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाला.जळीत शेतक-याच्या मृत्यू प्रकरणी संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे.या प्रकरणातील कार्यकारी अभियंता,पाटबंधारे बीड, उपजिल्हाधिकारी, बीड(भूसंपादन),उपअधीक्षक भूमी अभिलेख,बीड यांचेवर भा.दं.वी.306,34 कलम प्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जरी गुन्हे दाखल झाले असले तरी संभाजी ब्रिगेड या घटनेला जबाबदार अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी दिला आहे.

या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.सदर घटनेची हकिकत अशी की,बीड मध्ये पाटबंधारे विभागात पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला आहे.बीड पाटबंधारे विभागाकडून (Beed Irrigation Department) मावेजा मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतकर्‍याने कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता.यात गंभीर जखमी झालेल्या शेतक-याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु,उपचारा दरम्यान,मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.अर्जुन कुंडलिकराव साळुंके असं मयत शेतकऱ्यांचे नाव आहे.सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अर्जुन साळुंके यांनी बीड पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात स्वत:ला पेटवून घेतले होते.जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र,उपचारा दरम्यान या शेतकऱ्याचा मध्यरात्री मृत्यू झाला.अर्जुन साळुंके यांनी यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.याची दखल घेतली नसल्याने अर्जुन यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.बीड तालुक्यातील पाली येथील अर्जुन कुंडलिकराव साळुंके या शेतकर्‍याची जमीन पाटबंधारे विभागाने संपादित केलेली आहे.या जमिनीच्या एकत्रीकरणाबाबतचा वाद आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी पाटबंधारा विभाग कार्यालयाचे उंबरे झिजवत आहे.संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळत नसल्याने अर्जुन साळुंके यांनी काही महिन्यांपूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.मात्र,याची साधी दखल संबंधीत विभागाने घेतली नाही.अखेर सोमवारी दुपारी शेतकर्‍याने कार्यालयात पेट्रोल ओतून घेत जाळून घेतले.यात ते 50 टक्क्यांहून अधिक भाजले होते.मध्यरात्री अर्जुन साळुंके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अर्जुन साळुंके यांच्या कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.त्यामुळे या प्रकरणातील पिडीत शेतकरी कुटुंबाला आता तरी न्याय द्या अन्यथा गुन्हे दाखल झाले असलेअं तरी संभाजी ब्रिगेड या घटनेला जबाबदार असणा-या अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी दिला आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.