सोयगाव: जरंडी कोविड केंद्र कर्मचाऱ्याविना ,दुसऱ्या लाटेचा तालुक्याला धसका ,प्रशासनाचे दुर्लक्ष

Last Updated by संपादक

सोयगाव दि.२५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― औरंगाबाद जिल्ह्यात कोविड-१९ च्या संसर्गाचा दुसऱ्या लाटेचा शक्यता वर्तविण्यात आली असतांना मात्र सोयगाव तालुक्यासाठी एकमेव असलेल्या जरंडी कोविड केंद्र मात्र कर्मचाऱ्यां विना रिकामे झाले असून येथील कोविड अधिकाऱ्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांचे बंधपत्र संपल्याने कोविड केंद्राचा पदभार या कर्मचाऱ्यांनी सोडला आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यां विना असलेल्या कोविड केंद्रात उपचाराची चिंता भेडसावत आहे.

सोयगाव तालुक्यासाठी एकमेव जरंडीचे कोविड केंद्र आहे,परंतु या कोविड केंद्रातील कोविड अधिकारी डॉ.आनंद भाले यांचेसह सात आरोग्य कर्मचाऱ्यांचे बंधपत्र संपून महिना उलटला तरीही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या कर्मचाऱ्यांना नियमित केलेले नसल्याने ऐन धास्तीत जरंडी कोविड केंद्र कर्मचाऱ्यां विना ओस पडले आहे.या कोविड केंद्राची सफाई कर्मचाऱ्यांअभावी सफाई झालेली नाही.त्यामुळे दिवाळी नंतर हे कोविड केंद्र सफाईविना झाले आहे.एकीकडे दुसऱ्या लाटेला संघर्ष करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असतांना दुसरीकडे मात्र या कोविड केंद्राची दुरवस्था झाली आहे.अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने ऐनवेळी आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपाय योजना शासनाकडे नाही.बंधपत्र संपलेल्या कर्मचाऱ्यांनी कोविड केंद्र सोडले आहे.या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आलेले नसल्याने कोविडची जबाबदारी कोण घेईल असा प्रश्न तालुकुयात उपस्थित झाला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.