अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बर्दापुर येथील पुतळा विटंबना प्रकरणी रिपाइं (आठवले गट) कडून बुधवार,दिनांक 25 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
दि.28 ऑक्टोबर 2020 रोजी बर्दापूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली.या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करावी व तपास सीबीआय कडे देण्यात यावा या मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे बर्दापूर फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी मागण्यांचे निवेदन तहसिलदार विपीन पाटील यांना देण्यात आले असून आंदोलनची दखल घेतली नाही.तर 3 डिसेंबर पर्यंत आरोपी निष्पन्न नाही झाले तर येत्या 6 डिसेंबरला महाराष्ट्रातील भिम अनुयायी बर्दापूर येथे जमतील व आंदोलन करतील.याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन या नात्याने तहसिलदार व पोलिस प्रशासनावर राहील असा इशारा रिपाइं (आठवले गट) च्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी रास्ता रोको आंदोलनात बर्दापूरच्या माजी सरपंच मंदाकिनी गंडले,विजयाबाई गंडले,कुशाबाई गंडले,ईटाबाई ढोबळे,विद्या कांबळे,तसेच रिपाइंचे कपीलभाऊ कागदे, दशरथ सोनवणे,अॅड.दिपक कांबळे,प्रमोद दासुद, मनोज इंगळे,मंगेश जोगदंड,राहूल गंडले, भागीरथ कोरडे, अजिंक्य सोनवणे, विलास वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते, महीला,युवक सहभागी झाले होते.