भारतीय सैन्यात निवड झालेल्या व वैद्यकीय प्रवेशासाठी पाञ ठरलेल्या विद्यार्थ्यांचा अंबाजोगाई पीपल्स बँकेकडून सत्कार

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील येल्डा,राक्षसवाडी,चिचखंडी या डोंगरपट्टयातील गावचे रहिवासी आणि शहराच्या विविध भागातील जे विद्यार्थी भारतीय सैन्यात निवडले गेले तसेच काही विद्यार्थी व विद्यार्थीनी या वैद्यकीय प्रवेशासाठी पाञ ठरल्याबद्दल अंबाजोगाई पीपल्स बँकेने त्यांचा सत्कार करून कौतुक केले.यावेळी बोलताना चेअरमन राजकिशोर मोदी म्हणाले की,कठोर परिश्रम करून आणि प्रतिकूल परिस्थितीत कठोर अभ्यास करून मोठ्या परीश्रमातून कमावलेले हे यश कायम टिकते.असे यश प्रेरणादायी असते.भारतीय सैन्यात निवड होणे ही बाब अभिनंदनीय आहे.तर लोकांचा विश्वास देवावर आणि देवानंतर डॉक्टरांवर असतो.कारण,रूग्णांच्या चांगले आरोग्यासाठी डॉक्टर बांधव हे अहोराञ परीश्रम घेतात.प्रतिकूल परिस्थितीत मुडेगावकर,भालेराव,निसर्गंध व आचार्य या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले यश हे कौतुकास्पद आहे.

सहकार भवन,प्रशांतनगर येथे मंगळवार,दिनांक 24 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील येल्डा,राक्षसवाडी,चिचखंडी या डोंगरपट्टयातील गावचे रहिवासी आणि शहराच्या विविध भागातील जे विद्यार्थी भारतीय सैन्यात निवडले गेले तसेच काही विद्यार्थी व विद्यार्थीनी या वैद्यकीय प्रवेशासाठी पाञ ठरल्याबद्दल अंबाजोगाई पीपल्स बँकेने त्यांचा सत्कार करून कौतुक केले. भारतीय सैन्यात निवडले गेलेले विद्यार्थी मोरेश्वर सुनिल खोडवे,सायस माधव खोडवे,श्रीधर युवराज खोडवे,गणेश आनंदराव गडदे(सर्व राहणार येल्डा), दयानंद लक्ष्मण गडदे (राक्षसवाडी), संदीपान विष्णू धायगुडे (चिचखंडी) यासह अंबाजोगाई शहरातील राहुल रामकिसन हंगरगे(धनगर गल्ली), अजय रमेश गाडेकर (धनगर गल्ली) यांचेसह वैद्यकीय प्रवेशासाठी पाञ ठरलेले कल्याणी दिगंबरराव मुडेगावकर,वैभव गौतम भालेराव,दिक्षांत गौतम भालेराव,रोहित भाऊसाहेब निसर्गंध,प्रणव नामदेवराव आचार्य या
गुणवंत विद्यार्थ्यांचा फेटा बांधून शाल, वृक्षरोप देवून गुणगौरव करण्यात आला.याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा सत्कार करून पुढच्या वाटचालीसाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,पञकार अविनाश मुडेगावकर, पञकार दत्ताञय दमकोंडवार,पञकार परमेश्वर गित्ते, नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक वाजेद खतीब, नगरसेवक धम्मपाल सरवदे,नगरसेवक आसेफोद्दीन खतीब, माजी नगरसेवक खालेद चाऊस, कचरूलाल सारडा, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य राणा चव्हाण, बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,दिनेश घोडके,सहशिक्षक विजय रापतवार, फहेमीद फारूकी,शेख मुक्तार,चेतन मोदी, भारत जोगदंड,जुनैद सिद्दीकी,प्रताप देवकर,अमोल मिसाळ,महेश वेदपाठक आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूञसंचालन विजय रापतवार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार राणा चव्हाण यांनी मानले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.