सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी सोयगाव तालुक्यात पाच बुथवर १०१८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.निवडणुकीच्या तयारी अंतिम टप्प्यात आली असून निवडणुकीत १०० कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात गुंतविण्यात आले आहे.
पदवीधर निवडणुकीसाठी सोयगाव , सावळदबारा,जरंडी आणि बनोटी या पाच मतदान केंद्रावर मतदान होणार असून यामध्ये सोयगाव शहरात दोन मतदान केंद्रे आहे.यासाठी १०० कर्मचारी देण्यात आले आहे.पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे,निवडणूक निर्णायक अधिकारी ब्रिजेश पाटील,तहसीलदार प्रवीण पांडे,निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांच्या अधिपत्याखाली निवडणुकीचे कामकाज पाहण्यात येणार आहे.