सामाजिक कार्यकर्ते अविनाश साठे यांचा स्तुत्य उपक्रम
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश साठे यांनी आपली मुलगी अनन्या हिच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील 110 गरजू,विधवा व होतकरू महिलांना साड्या वाटप करून मुलीचा जन्मदिवस साजरा केला.
शहरातील सिध्दार्थनगर येथे गुरूवार,दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते अविनाश साठे यांनी आपली मुलगी अनन्या हिच्या तिस-या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पृथ्विराज साठे तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,नगरसेवक मनोज लखेरा,रणजित लोमटे,नगरसेवक अशोकभैय्या मोदी, नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक संजय गंभीरे, दत्ताभाऊ सरवदे,शेख मुक्तार,सूर्यवंशी साहेब,प्रा.संदीपान हजारे हे मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.प्रारंभी 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमीत्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले.यावेळी बोलताना माजी आमदार पृथ्विराज साठे म्हणाले की, सामाजिक बांधिलकी म्हणून गरिबांना मदत केली पाहिजे.मुली आणि स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे असे सांगून अविनाश साठे हे करीत असलेल्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.याप्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की,स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरूषांच्या बरोबरीने समानतेने वागविले पाहिजे,गरिबांना अडीअडचणीच्या वेळी पुढे येवून मदत केली पाहिजे. अविनाश साठे यांनी घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचे मोदी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.राजेंद्र लोदगेकर म्हणाले की,यापूर्वी ही अविनाश साठे यांनी वेळोवेळी मुलीच्या वाढदिवसानिमीत्ताने स्वाराती रूग्णालयात फळ वाटप, वृध्दाश्रमात अल्पोपहार वाटप,सिध्दार्थनगर येथील समाजमंदिरास फॅन,ट्युब लाईट भेट स्वरूपात दिले आहे.मुलगी आराध्या हिच्या जन्मावेळी व मुलगी अनन्या हिच्या वाढदिवशी सामाजिक बांधिलकी जोपासत उपक्रम आयोजित करून तसेच मिठाई वाटप करून चांगला पायंडा पाडला आहे.ही बाब अभिनंदनीय आहे.यावेळी सूञसंचालन प्रा.रमेश सरवदे यांनी करून जनसेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिव अविनाश साठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन होके,ऋषिकेश वाघमारे,सचिन खरटमोल,अभिमान साबळे,नयन गव्हाणे, सतीष सावंत,अरूण साठे,अनिकेत साठे,तुषार साठे,इरफान शेख, सोहन अहिरे,शेख युनूस,संतोष साठे, दीपक साठे,विजय साठे,शंकर साठे, शिवम साठे,रवी साठे, यशराज अलझेंडे, सुखदेव गायकवाड यांनी पुढाकार घेतला.या कार्यक्रमासाठी सिद्धार्थनगर मधील प्रतिष्ठित नागरिक महादूदादा होके, मुश्ताक पटेल,बाबाजी साठे,कचरूदादा साबळे,शिवाजी सातपुते,रमेश सोनकांबळे,दिलीप साठे,राजू कसबे, नागेश सावंत,शेख अफिक,रिजवान खान,जुनैद सिद्दिकी, फहेमीद फारूकी, अरूण लोखंडे,सुभाष काळे व परिसरातील युवक,माता,भगिनी उपस्थित होते.