पाटोदा:गणेश शेवाळे― महाराष्ट्रराज्य ग्रामसेवक युनियन डि.एन.ई. १३६ शाखा पाटोदा तालुका ग्रामसेवक युनियनच्या सचिवपदी प्रदीप सखाराम बनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी बबनराव नागरगोजे व उपाध्यक्षपदी दीपक वाघमारे आणि कोषाध्यक्षपदी विठ्ठल राख व प्रसिद्धीप्रमुख म्हणून भाऊसाहेब वीर यांची एकमताने दिनांक २४ रोजी झाली निवड झाली यामुळे त्यांचे तालुक्यातून स्वागत होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन १३६ पाटोदा तालुका शाखेची बैठक दि,२४/१०/२० रोजी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका संघटनेची बैठक घेण्यात आली यामध्ये तालुका सचिवपदी प्रदीप बनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच या बैठकीमध्ये नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये तालुका अध्यक्ष बबन नागरगोजे उपाध्यक्ष दीपक वाघमारे प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वीर , कोषाध्यक्ष विठ्ठल राख ,सह सदस्य नवनाथ बहिर ,गणपत पवार ,हरिचंद्र पवार , मोमीन कदिर , मधुकर बचुटे , श्रीमती प्रगती खेडकर ,श्रीमती संगीता माने यांची निवड करण्यात आली असून या नूतन कार्यकारणीचे पाटोदा तालुक्यात जागोजागी स्वागत होत आहे.