सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― दुरवस्था झालेल्या आरोग्य उपकेंद्राचे कुलूप व कोयंडा तोडून अज्ञातांनी नुकसान केल्याचा प्रकार रविवारी घोसला ता.सोयगाव येथे उघडकीस आला असून अद्यापही प्रशासनाच्या कोणत्याही यंत्रणांनी या प्रकारची पाहणी केलेली नव्हती त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
घोसला ता.सोयगाव येथे लाखो रु निधी खर्चून शासनाने गावातच आरोग्य सुविधा मिळावी यासाठी उपकेंद्राची इमारत उभारली आहे.या इमारतीचा ताबा अद्यापही ग्रामस्थांना मिळालेला नसतांना या उपकेंद्राची मोठी दुरवस्था झाली होती.या प्रकरणी मराठा प्रतिष्ठानच्या वतीने पुढाकार घेवून सोपान गव्हांडे यांनी दुरुस्तीही केली परंतु तरीही जिल्हा परिषदेने याकडे लक्ष न दिल्याने दुरवस्थेत असलेल्या या उपकेंद्राची अज्ञातांनी रात्री कुलूप तोडून मोठे नुकसान केले आहे.या प्रकारची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आले चोरीला..अन गेले पळून-
घोसला आरोग्य उपकेंद्राची गावाबाहेरची इमारत पाहून अज्ञात चोरट्यांनी आरोग्य उपकेंद्र फोडून चोरीचा प्रयत्न केला परंतु आधीच दुरवस्था झालेल्या या उपकेंद्रात काहीच नसल्याने आरोग्य उपकेंद्रातील धूळ पाहून अज्ञात चोरट्यांनी घटनास्थळावरून पल काढला होता.त्यामुळे चोरूच्या उद्देशाने आलेले अज्ञातांनी मात्र घटनास्थळावरून पल काढल्याचा अंदाज ग्रामस्द्थांनी वर्तविला आहे.या प्रकारामुळे मात्र गावात घबराट पसरली आहे.
काहीच नसल्याने चोरीचा प्रयत्न फसला-
आरोग्य उपकेंद्रात धूळ आणि दुर्गंधी शिवाय काहीच नसल्याने कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न फसला असल्याची चर्चा घोसला परिसरात सुरु आहे.