महाराष्ट्राच्या उभारणीत यशवंतराव चव्हाणांचे मोलाचे योगदान-प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील कै.बेथूजी गुरूजी प्रतिष्ठाणच्या वतीने लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचा 36 वा स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे म्हणाले की,महाराष्ट्राच्या जडण-घडणीमध्ये लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे.महाराष्ट्राचा सर्वांगिण,समतोल विकास व समानता हे यशवंतरावांचे स्वप्न होते असे प्रतिपादन डॉ.रोडे यांनी केले.

प्रारंभी लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व भारत जोडो अभियानाचे कार्यवाहक प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे तर अध्यक्षस्थानी प्रतिष्ठाणचे प्रवर्तक सुरेंद्रनाना खेडगीकर हे उपस्थिती होते.कोविड-19 अंतर्गत सदर कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांनी केले.तर अध्यक्षीय समारोप सुरेंद्र नाना खेडगीकर यांनी केला.उपस्थितांचे आभार श्रीधर काळेगावकर यांनी मानले.तर या प्रसंगी नायब तहसीलदार महेश राडीकर यांचीही उपस्थिती होती.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.