औरंगाबाद, दिनांक 30: औरंगाबाद जिल्ह्यात आज 64 जणांना (मनपा 27, ग्रामीण 37) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 41240 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 78 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43378 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1148 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 990 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (65)
बेगमपुरा (1), गजानन कॉलनी, गारखेडा (2), घाटी परिसर (1), पैठण रोड (1), चिनार गार्डन (1), गुरूप्रसाद नगर, बीड बायपास (1), रेल्वे स्टेशन परिसर (3), अरिहंत नगर (3), उल्कानगरी (2), अन्य (42), उस्मानपुरा (1), कासारीबाजार (2), नेहरू चौक (1),उस्मानपुरा (3), गारखेडा परिसर (1)
ग्रामीण (13)
गंगापूर (1), कन्नड (2), अन्य (10)
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत एन सात सिडकोतील 75 वर्षीय पुरूष, शिवशंकर कॉलनीतील 50 वर्षीय पुरूष, खासगी रुग्णालयात अपतगाव येथील 62 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.