औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सोयगाव तालुक्यात पदवीधरसाठी  ७६ टक्के मतदान ;१०१८ मतदारांपैकी ७७४ ,मतदारांनी बजावला हक्क

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―पदवीधरसाठी सोयगाव तालुक्यात टक्के मतदान झाले असून १०१८ मतदारांपैकी पाच मतदान केंद्रांवर ७७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.पहाटे धीम्या गतीने सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेने दुपारनंतर वेग घेतला होता.सोयगाव तालुक्यात सोयगाव,बनोटी,सावळदबारा आणि जरंडी या पाच मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाल्याची माहिती पदनिर्देशित अधिकारी प्रवीण पांडे यांनी दिली.

उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील,तहसीलदार प्रवीण पांडे,नायब तहसीलदार मकसूद शेख,नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांच्या पथकांनी मतदान केंद्रांवर भेटी देवून आलेल्या अडचणींवर तातडीने मार्ग काढून प्रक्रिया सुरळीत केली होती.

सोयगाव तालुक्यात केंद्रनिहाय झालेले मतदान-

सोयगाव तालुक्यात पदवीधरसाठी महिला मतदारांनी पहिल्यांदाच पाठ फिरविली असून १३५ महिला मतदारांपैकी ९७ महिला मतदारांनी मतदान केले असून ८८३ पुरुषांपैकी ६७७ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

केंद्रनिहाय मतदान—

सोयगाव महसुली मंडळ-२२४ पैकी १५७

सोयगाव नगर पंचायत-१९२ पैकी १५७

जरंडी-९० पैकी ७०

बनोटी-३४६ पैकी २७५

सावळदबारा-१६६ पैकी ११५ असे एकूण तालुक्यात पाच मतदान केंद्रांवर ७६ टक्के मतदान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button