अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
भाजपा सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध,निषेध करीत दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठींबा देत असल्याची भूमिका घेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवार,दिनांक 3 डिसेंबर रोजी भारताच्या महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवार,दिनांक 3 डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,केंद्रातील भाजपा सरकार शेतकरी,शेतमजुर,कष्टकरी विरोधी धोरण राबवत असून शेतक-यांचे हित साधण्यासाठी असल्याचे सांगत शेतक-यांवर लादत असलेले शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ दिल्ली सीमेवर मागील काही दिवसांपासुन शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे.शेतकरी विरोधी भाजपाने केंद्रात आवश्यक वस्तु,(संशोधन) विधेयक 2020,कृषी उत्पादन व वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक 2020,हमीभाव संदर्भातील विधेयक संपूर्ण व्यवस्था दोन-चार कार्पोरेट व्यवस्थापकांना खुश करण्यासाठी मोदी सरकार चर्चा न करता विधेयक मंजुर करून शेतकरी विरोधी कायदे तयार करीत आहे व स्वामीनाथन आयोगाच्या मागण्यांना धुडकावत आहेत.भाजपाच्या केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधात काळ कायदे संमत केले.त्या विरोधात संपूर्ण देशभरात मुख्यतः दिल्लीच्या सिमेवर शेतक-यांनी मोठे आंदोलन उभारले आहे.या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या आदेशान्वये भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात येत असून दिल्ली सिमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलनाच्या माध्यमातून पाठींबा दर्शविण्यात येत आहे असे नमूद केले आहे. सदरील निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (अ.जा.विभाग) चे राज्य समन्वयक संजय वाघमारे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अॅड.अनंतराव जगतकर,काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष
वसंतराव मोरे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तारेखअली उस्मानी,माजी बीड जिल्हा सरचिटणीस भगवानराव ढगे,ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव यांच्या स्वाक्ष-या आहेत.तर
शिवाजीराव जाचक हे उपस्थित होते.