अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
जागतिक दिव्यांग दिनाचे निमित्ताने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ व बेथुजी गुरूजी प्रतिष्ठानच्या वतीने गुरूवार,दिनांक 3 डिसेंबर रोजी दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आला.
प्रारंभी डॉ.हेलन केलर व भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.प्रतिकूल शारीरिक परिस्थितीवर मात करून जागृती प्रकल्प,नमन सेवा समिती,मध्यप्रदेशचे समन्वयक बिभीषण आंबाड,अनंतराव लोखंडे (परळीकर), संजय देशमुख,विष्णु राऊत,वसंतराव दहिवाळ यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.या प्रसंगी व्यासपीठावर अनंतराव लोखंडे (परळीकर),सुरेंद्रनाना खेडगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन करून प्रा.राम चौधरी (धर्मापुरीकर) यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की,दिव्यांग बांधवांप्रती सदभावना व्यक्त करणे,दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे तसेच त्यांचे आर्थिक,सामाजिक व मानसिक पुनर्वसन करणे,जाणीव जागृती करणे या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन covid-19 सुचनांचे पालन करून करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार श्रीधर काळेगावकर यांनी मानले.यावेळी ज्येष्ठ कवी मधुकर बाभुळगावकर यांनी आपल्या स्वलिखीत कवितेतून दिव्यांग बांधवांच्या कार्याप्रती आदर व्यक्त केला.