अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
अंबाजोगाईतील मान्यवरांसह शहराच्या विविध भागातील जे विद्यार्थी व विद्यार्थीनी वैद्यकीय प्रवेशासाठी पाञ ठरले त्यांचा बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी शुक्रवार,दिनांक 4 डिसेंबर रोजी सत्कार करून कौतुक केले.
यावेळी बोलताना बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की,कठोर परिश्रम करून आणि प्रतिकूल परिस्थितीत कठोर अभ्यास करून मोठ्या परीश्रमातून कमावलेले हे यश कायम व चिरकाल टिकते.असे यश सर्वांसाठी प्रेरणादायी असते.शिवकुमार निर्मळे यांची उपमुख्याध्यापक पदावर निवड होणे,प्रतिमा कमलाकर कांबळे यांनी पीएच.डी पदवी प्राप्त करणे,चिन्मय नरेंद्र जोशी,शुभदा सतीष देशपांडे (हिवरेकर) यांचे वैद्यकीय प्रवेशासाठी पाञ ठरणे,रोहित बळीराम लांडगे याचे आय.आय.टी प्रवेश निश्चित होणे या सोबतच अंबाजोगाई अॅक्वा युनियन या संघटनेच्या माध्यमातून एकञित येवून युनियनचे अध्यक्ष दत्ता कदम,उपाध्यक्ष अमजद गवळी,उपाध्यक्ष दिपक गुंजाळ,सचीव जगदीश ढेले,सहसचीव सय्यद इसाकभाई,कोषाध्यक्ष बाळासाहेब मुंडे यांचे समान उद्देशाने काम करणे ही बाब अंबाजोगाई शहरासाठी तशी अभिनंदनीय आहे.विशेषता: विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले यश हे तर कौतुकास्पद आहे.सहकार भवन,प्रशांतनगर येथे शुक्रवार,दिनांक 4 डिसेंबर रोजी शहरातील रहिवासी जे विद्यार्थी व विद्यार्थीनी हे वैद्यकीय प्रवेशासाठी पाञ ठरले त्यांचा राजकिशोर मोदी यांनी सत्कार करून कौतुक केले. वैद्यकीय प्रवेशासाठी पाञ ठरलेले चिन्मय नरेंद्र जोशी,शुभदा सतीष देशपांडे (हिवरेकर) तसेच रोहित बळीराम लांडगे याचे आय.आय.टी साठी प्रवेश निश्चित होणे सोबतच शिवकुमार निर्मळे यांची उपमुख्याध्यापक पदावर निवड होणे,प्रतिमा कमलाकर कांबळे यांनी पीएच.डी पदवी प्राप्त करणे आणि अंबाजोगाई अॅक्वा युनियन या संघटनेचे नुतन पदाधिकारी अध्यक्ष दत्ता कदम,उपाध्यक्ष अमजद गवळी,उपाध्यक्ष दिपक गुंजाळ,सचीव जगदीश ढेले,सहसचिव सय्यद इसाकभाई,कोषाध्यक्ष बाळासाहेब मुंडे यांच्या निवडी बद्दल फेटा बांधून शाल,पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.याप्रसंगी उपमुख्याध्यापक शिवकुमार निर्मळे,डॉ.प्रतिमा कमलाकर कांबळे यांनी सत्काराला उत्तर दिले.तर विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मनोगत व्यक्त केले.मान्यवर,यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा सत्कार करून पुढच्या वाटचालीसाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक सुनिल व्यवहारे,डॉ.राजेश इंगोले,संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य राणा चव्हाण,बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,दिनेश घोडके,सहशिक्षक विजय रापतवार,शेख मुक्तार,जावेद गवळी,जुनैद सिद्दीकी,प्रताप देवकर,महेश वेदपाठक आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूञसंचालन करून विजय रापतवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.