भारत बंदला अंबाजोगाईत उत्स्फुर्त पाठींबा ,शेतकर्‍यांच्या समर्थनासाठी विविध पक्ष,संघटनांचा सहभाग

अंबाजोगाई (प्रतिनिधी): दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास लोकचळवळ करण्याच्या हेतूने आणि पुकारलेला भारत बंद यशस्वी करण्यासाठी अंबाजोगाईत विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना यांनी एकञ येऊन याबाबत अंबाजोगाई शहरात रविवार आणि सोमवार रोजी सर्वपक्षीय बैठका घेवून शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मंगळवार,दिनांक 8 डिसेंबर रोजी होणा-या भारत बंदला जाहीर पाठींबा दर्शविला होता.या बंदला कुठलेही गालबोट लागता बंद शांततेत झाला.

तत्पुर्वी सदर बंदसाठी अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक आणि मरकज मस्जीद शेजारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी विविध पक्षाच्या मान्यवर आणि लोकशाहीच्या मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात लोकशाही मार्गाने सहभाग म्हणून शांततेत व यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी सर्वच उपस्थित मान्यवरांनी किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ भारत बंद मध्ये अंबाजोगाई शहरातील व्यापारी,शेतमजूर,शेतकरी,कष्टकरी,मजूर वर्ग,तरूण,सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी सहभाग नोंदवून शहरातील आस्थापने बंद ठेवून आंदोलनास सहकार्य करावे व देशाचा पोशिंदा असणा-या बळीराजाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन अंबाजोगाईतील कृषि विधेयका विरोधातील सामाजिक संघटना,पक्ष,कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवार,दि.8 डिसेंबर रोजी बंद निमित्ताने देशाचे राष्ट्रपती यांना उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात शेतकर्‍यांविरोधीचे जुलमी कायदे रद्द करावेत तसेच भाजपा व त्यांचे मित्र पक्ष हे ईव्हीएम मशिनच्या बळावर सत्तेत येवून जनविरोधी,शेतकरी विरोधी,कायदे करीत आहेत म्हणून या पुढे ईव्हीएम मशिनवर निवडणूक मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे अशी विनंती सर्व पक्ष संघटनांच्या वतीने करण्यात आली.मंगळवारी अंबाजोगाई शहरातील भारतत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या नामफलकाला अभिवादन करून अंबाजोगाई शहर बंद ठेवण्याची विनंती सर्व पक्ष व संघटनांच्या वतीने करण्यात आली.यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,महाराष्ट्र गवळी समाज संघटना,संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ,संविधान रक्षक सेना,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,वंचित बहुजन आघाडी,आम आदमी पार्टी,महाराष्ट्र नवनिर्माण सेना,स्वाभिमानी शेतकरी संघटना,लोकजनशक्ती पार्टी, प्रहार जनशक्ती पक्ष,मराठा महासंघ, शेतकरी कामगार पक्षा,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,प्रहार कामगार संघटना,एआयएमआयएम पक्ष,अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती,इंडियन लॉयर्स असोसिएशन,पोलिस मिञ संघटना, भीमसेना,भीम आर्मी, भारतीय विद्यार्थी मोर्चा,राष्ट्रीय किसान मोर्चा,प्रोटॉन,प्रहार दिव्यांग संघटना,टिपू सुलतान सेना पार्टी, रिपब्लिकन सेना,राष्ट्रीय मुल निवासी, महिला संघ,बसव ब्रिगेड,बहुजन समाज पार्टी,भारतीय बेरोजगार मोर्चा,मुस्लिम सेवा संघ,समाजवादी पक्ष, युवा भिम सेना यांचे नेते व कार्यकर्ते यांच्यासह शहरातील व्यापारी,तालुक्यातील शेतकरी,शेतमजुर,कष्टकरी,श्रमिक वर्ग यांची उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post नर्सिंग संर्वगातील वरिष्ठ रिक्त पदे तातडीने भरण्याची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची सूचना
Next post आठ महिन्यापासून बंद असलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आजपासून पर्यटकांसाठी खुली