अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

जिल्हा नियोजन समितीच्या अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी दत्ताञय पाटील यांची नियुक्ती

अंबाजोगाई (प्रतिनिधी):
बीड जिल्हा नियोजन समितीच्या अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ताञय ज्ञानोबाराव पाटील यांची नियुक्ती केली आहे.आबा पाटील यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ताञय पाटील यांनी यापूर्वी अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद,
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालकपद भूषविले आहे.सध्या ते बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव तसेच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थानिक कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत.सहकार व शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आबा पाटील हे सर्वञ ओळखले जातात.त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाची व कार्याची दखल घेऊन बीड जिल्हा नियोजन समितीच्या अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्षपदी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ताञय ज्ञानोबाराव पाटील यांची नियुक्ती केली आहे.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना व जिल्हा नियोजन समितीच्या समन्वय समितीच्या नियुक्त्यांमधून पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील सर्व घटक,पदाधिकारी यांना न्याय देण्याच्या दृष्टीने सोशल इंजिनिअरिंगचा यशस्वी प्रयोग केल्याचे या नियुक्त्यांमधून दिसून येते.ग्रामीण भागाचा सर्वांगीण व व्यापक विकास साधण्याच्या उद्देशाने समाजातील अविकसित स्तराचा विकास साधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या विविध योजनांचा समन्वय व पुनर्विलोकन साधून योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्यात याव्यात याकरीता ही समन्वय समिती स्थापन करण्यात येते. दरम्यान ना.मुंडे यांच्या निर्देशानुसार अध्यक्षपदी दत्ताञय ज्ञानोबाराव पाटील यांची तर समितीचे सदस्य म्हणून आ. संजयभाऊ दौंड,अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती सौ.विजयमाला जगताप,खरेदी विक्री संघाचे बालासाहेब सोळंके,औदुंबर मोरे, अर्जुनराव वाघमारे, जयप्रकाश (बाळासाहेब) सोनवणे,सचिन (बाळासाहेब) देशमुख,सखाराम टेकाळे,सौ.शिलाताई सोमवंशी,सौ.सविताताई कोकरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.शासन नियमानुसार अंबाजोगाईचे तहसिलदार हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार असून या समितीची बैठक आयोजित करण्याची जबाबदारीही तहसिलदार यांची असेल.दरम्यान ग्रामीण भागातील व्यापक विकासाच्या योजनांचा लाभ सर्वार्थाने समाजातील गरजू घटकांपर्यंत पोचविण्यासाठी या समितीने काम करावे या सुचनेसह सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे,अॅड.बाळासाहेब ज्ञानोबाराव पाटील, सौ.विजयाताई दत्ताञय पाटील, प्राचार्य शाहूराव गुळभिले तसेच श्री मुकुंदराज प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.