अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या माध्यमातून वंचित घटकांसाठी काम करणार – जिल्हाध्यक्ष गोविंद जगधने

अंबाजोगाई (प्रतिनिधी):
अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी गोविंद जगधने तर जिल्हा संघटकपदी बाळासाहेब राऊत यांची निवड करण्यात आली.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांच्या हस्ते व राज्य सचिव काशिनाथ कांबळे, मधुकर आल्टे,अॅड. सिध्दार्थ कांबळे या मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी गोविंद जगधने सर तसेच जिल्हा संघटकपदी बाळासाहेब राऊत यांची निवड करण्यात येवून त्यांना नियुक्तीपञ देण्यात आले.नुतन पदाधिकारी यांचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.आपल्या निवडी विषयी बोलताना गोविंद जगधने म्हणाले की,अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात गोरगरीब जनतेसाठी काम केले जाईल.सुशिक्षित बेरोजगार युवकांना मुद्रा लोन,घरकुल योजना,शेतक-यांना शेती कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न करू,कष्टकरी,मजूर व श्रमजिवी घटकांसाठी रोजगार हमी भत्ता वाढ करणे,वृद्ध, निराधारांसाठी सन्मानधन,पेंशन योजना मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील.तसेच महिला,परित्यक्ता यांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाईल.समाजातील वंचित घटकांसाठी समितीचे माध्यमातून काम करू अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष गोविंद जगधने यांनी दिली.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.