अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

कृषि शिक्षणामुळे तयार होतील कुशल नवउद्योजक –सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे

अंबाजोगाई (वार्ताहर): येथील अंबाजोगाई कृषि महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पदवीच्या अंतिम वर्षात शेतीवर आधारित व पूरक व्यवसायात सक्षम करण्यात येते.अनुभवातून शिक्षण या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवून त्यांना उद्योग उभारणीचे कौशल्य दिले जाते. वाढत्या लोकसंख्येला समतोल आहार मिळविण्यासाठी शेतीस पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय हा होय.दूध व दुग्धजन्य पदार्थांची मूल्यवृद्धी केल्यास मानवी आहारात समतोल साधला जाऊन निव्वळ उत्पन्न ही वाढेल व त्याच बरोबर कुशल नवउद्योजक तयार होतील असे प्रतिपादनकृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    येथील कृषि महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने नूतन यंत्राद्वारे दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारंभात डॉ.ठोंबरे बोलत होते. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य मधुकर गायकवाड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वनामकृविचे माजी कुलसचिव डॉ.दिगंबर चव्हाण, कृषि विज्ञान केंद्राचे डॉ.सौरभ शर्मा,पञकार प्रा.अरूण गंगणे,पञकार संतोष बोबडे,वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते, डॉ.अरुण कदम व जिमखाना उपाध्यक्ष डॉ.प्रताप नाळवंडीकर यांची उपस्थिती होती.उद्घाटक प्राचार्य गायकवाड म्हणाले की,कृषिच्या विद्यार्थांनी कुशल मनुष्यबळ स्रोत म्हणून पुढे यावे व ग्रामीण शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रगतीत खारीचा वाट उचलावा.दुग्धप्रक्रियेतून मूल्यवृद्धी केल्यास व्यवसाय शाश्वत होऊन पशुपालकांना आर्थिक स्थैर्य मिळविण्यास मदत होईल.यावेळी डॉ.डी.ए.चव्हाण,डॉ.सौरभ शर्मा,पञकार प्रा. अरूण गंगणे व पञकार संतोष बोबडे यांनी समायोचित मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुग्ध तंत्रज्ञान प्रकल्प प्रमुख डॉ.नरेंद्र कांबळे यांनी केले,सूत्रसंचालन कवी राजेश रेवले यांनी तर आभार डॉ.विद्या तायडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.बसलिंगप्पा कलालबंडी,प्रा.सुनील गलांडे,प्रा.सुहास जाधव,डॉ.योगेश वाघमारे,प्रा.मन्मथ बेरकीले,अनंत मुंडे,सुनील गिरी,मनीषा बगाडे,माया भिकाणे, पूजा वावरगिरे,व्यंकटेश मगर,इरफान सय्यद व स्वप्नील शिल्लार यांनी विशेष परिश्रम घेतले.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.