राजकीय विश्‍वातला अदभूत चमत्कार : शरदचंद्रजी पवार

Last Updated by संपादक

पवार साहेबांविषयी लिहित असताना मला प्रश्‍न पडत आहे की,मी नेमकी कुठून सुरूवात करू कारण, “अब की बारी अटलबिहारी” म्हणून संबंध देश पातळीवर स्टार कँम्पेन राबवत असताना महाराष्ट्रातून 48 पैकी 37 खासदार घेवून दिल्लीकडे केलेली दमदार कुच असेल अथवा “अब की बार मोदी सरकार” चा बोलबाला असताना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार निर्माण करून त्या सरकारचे किमयागार,महाराष्ट्राला भाजपाच्या राजकिय चक्रीवादळा पासून वाचविण्याची घेतलेली कणखर व निर्भीड भूमिका असेल या सर्वच घटनांचा मी साक्षीदार आहे.त्यामुळे राजकीय विश्‍वातले एक अदभूत चमत्कार म्हणून पवार साहेबांकडे पहाता येईल.1993 साली लातूर-उस्मानाबाद व किल्लारीचा परिसर यासह मराठवाडा भूकंपाने हादरून गेला.जनजीवन उध्वस्त झाले.अशाही परिस्थितीत मुख्यमंत्री असताना पवार साहेब मराठवाड्याच्या मदतीस काही तासांत धावून आले हा इतिहास आहे.भूकंपग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे आदरणीय साहेब उभे राहिले.भूकंपग्रस्तांच्या घराचेच नाही.तर मनाचे ही पुन:र्वसन करण्याचे मोठे कार्य पवार साहेबांनी केले.महाराष्ट्रात अतिवृष्टी असेल,गारपीठ असेल अशा आपत्तीच्या काळात शेतकरी व त्रस्त जनतेच्या पाठीशी साहेब कायम उभे राहिले आहेत.गारपीठीवरून मला आठवले.महाराष्ट्रात काही वर्षांपुर्वी गारपीठीने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता.विशेषतः बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईसह अनेक तालुक्यात गारपीठीने मोठे नुकसान झाले होते.अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली व धायगुडा पिंपळा हा परिसर जणू काही काश्मिरचा भाग आहे.की,काय अशी आपत्ती आली.त्यावेळी थेट शेतक-यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी पवार साहेबांनी केली व शेतक-याला धिर दिला.राज्यात लोकसभेच्या निवडणूका लागल्या होत्या.आचारसंहिता लागू होती.एकाच वेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व निवडणूक आयोग यांच्याशी चर्चा करून आचारसंहितेस अंशता: शिथीलता देवून पवार साहेबांनी शेतक-यांना मदत मिळवून दिली होती.देशाचे कृषीमंत्री असताना बळीराजाला सुमारे 70 हजार कोटी रूपयांची कर्ममाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय पवार साहेबांच्या पाठपुराव्याने तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला घ्यावा लागला.राज्याचे मुख्यमंत्री असताना सत्ता गेली तरी बेहत्तर परंतु,सत्तेची पर्वा न करता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नामविस्तार करण्याचा मोठा निर्णय पवार साहेबांनी घेतला.संबंधीत निर्णयाचे श्रेय घेण्याची हिंम्मत त्यावेळच्या साहेबांच्या सहकार्यांनी दाखविली नाही हे विशेष यासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला व मागासवर्गीयांना 33 टक्के इतके आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय साहेबांच्या नेतृत्वात घेण्यात आला.याचा फायदा असा झाला की,ग्रामपंचायत,नगरपरिषद,महानगर पालिका,पंचायत समिती व जिल्हा परिषद या ठिकाणी विविध पदावंर काम करण्याची संधी महिला व मागासवर्गीय समाज बांधवांना मिळू शकली.हे मला आवर्जुन नमूद करावेसे वाटते.पवार साहेबांचे कर्तृत्व खाजगीत सर्व जण मान्य करतात.देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,केंद्रिय रस्ते व वाहतुक मंत्री नितीनजी गडकरी,दिवंगत नेते प्रमोदजी महाजन,बापुसाहेब काळदाते सर्वांनीच पवार साहेबांशी आपला स्नेह असल्याचे जाहिररीत्या वेळोवेळी कबुल केले आहे.व्यक्तीगत कौतुकास हुरळून न जाता.पुरोगामी विचारांना कुठले ही गालबोट न लागू देता पवार साहेबांनी धर्मांध शक्तींच्या विरोधात लढण्याची भूमिका वेळोवेळी घेतली आहे.याची राजकिय किंमत ही त्यांना चुकवावी लागली आहे.सध्याच्या परिस्थितीत धर्मनिरपेक्ष शक्तींनी पवार साहेबांच्या पाठीशी उभे राहिल्यास महाराष्ट्राचे पंतप्रधान पदाचे स्वप्न पुर्ण होवू शकेल.कारण,युपीएच्या प्रमुखपदाची जबाबदारी पवार साहेबांकडे सोपविण्याविषयी मित्र पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याचे माध्यमातून कळते आहे.आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना 80 व्या वाढदिवसानिमित्त मनःपुर्वक शुभेच्छा व हार्दिक अभिष्टचिंतन..!

लेखक – अंकुश ढोबळे,अंबाजोगाई जि.बीड

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.