सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना प्रतिबंधात्मक लससाठी सोयगाव तालुक्यातील १७० जणांची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आली असून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आकडेवारी रात्री उशिरापर्यंत हाती आली नव्हती त्यामुळे या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी तालुका आरोग्य विभागाची पूर्वतयारी पूर्ण झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून लस प्राप्त होताच सोयगाव तालुक्यात या लस देण्याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून यामध्ये ५७ आरोग्य कर्मचाऱ्यांसह १९ खासगी डॉक्टर आणि ९४ आशा स्वयांसेविकांचा समावेश असून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा आकडा अद्याप हाती आलेला नव्हता त्यामुळे १७० जणांना कोविशील्ड लस देण्याबाबतची पूर्वतयारी झालेली असून सोयगाव तालुक्यात या लस साठीचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.
ओळख साठी पॅन व आधार-
आरोग्य कर्मचाऱ्यांचे ओळख ट्रेस करण्यासाठी त्यांचे पॅन व आधार घेण्यात आले असून ओळख पटल्याशिवाय लस देण्यात येणार नसल्याने आधी ओळख ट्रेस करूनच लस ची मात्रा देण्यात येणार आहे.
विभागनिहाय कर्मचारी-
तालुका आरोग्य कार्यालय-७
प्राथमिक आरोग्य केंद्र सावळदबारा-६
बनोटी-२४
जरंडी-२४ आशा स्वयंसेविका-९४ खासगी डॉक्टर १९ याप्रमाणे डाटा जिल्हा आरोग्य अधिकारी औरंगाबाद यांचेकडे पाठविण्यात आला आहे.