अविश्वास ठरावावर बॅलेट पेपरने मतदान
गेवराई:आठवडा विशेष टीम- गेवराई तालुक्यातील काठोडा ग्रा.पं. सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर ठराव पारित करण्यासाठी ग्रामसभा घेवून मतदान प्रक्रिया आज सकाळी सुरु झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत १५६० पैकी ६७८ मतदानाची नोंद झाली होती. दरम्यान अविश्वास ठरावामुळे सुरु असल्याने मतदानासाठी बॅलेट पेपरवर दोन चिन्हे असून त्यात सरपंच निवडी ठराव मंजूर व सरपंच निवडी ठराव नामंजूर असा उल्लेख आहे. ग्रामस्थ कोणाच्या बाजुने मतदान करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काठोडा येथे ग्रामपंचायत सरचपंच पदाविरोधी अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आज सकाळी ग्रामसभा घेवून मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार असून त्यानंतर लगेचच निकाल जाहिर करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिरूद्र सानप काम पाहत आहेत. यांच्यासह पंचायत समिती कर्मचारी, तलवडा पोलिस ठाण्याचे सपोनि महेंद्रसिंग चव्हाण यांच्यासह ३५ पं.स., आरोग्य कर्मचारी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका उपस्थित आहेत. दुपारपर्यंत शांततेत मतदान सुरु होते. मतदार ठरावाच्या बाजुने जातात की नामंजूर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरपंचाविरूध्द सदस्यांचा अविश्वास
काठोडा येथील ग्रामंपचायतमध्ये भाजपाचा सरपंच आहे. सरपंच जयराम घाटूळ यांच्याविरूध्द सदस्यांनी अविश्वास ठराव मांडलेला आहे. सदस्यांना विश्वास न घेता काम करणे, सार्वजनिक स्वच्छता, साथीच्या रोगा संदर्भात काळजी न घेणे, सदस्यांना हिशोब न दाखवणे, अधिकाराचा दुरुपयोग, १४ वित्त आयोगातील रक्कमेत भ्रष्टाचार, पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष आदी मुद्यांवरून सरपंच घाटूळ यांच्याविरूध्द अविश्वास मांडला होता. आज होत असलेल्या मतदानातून ग्रा.पं.कोणाकडे जाणार? याकडे लक्ष लागले आहे.