अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरी तर्फे शहरातील आशा आयसीयु अतिदक्षता व संशोधन केंद्रास रूग्णांच्या सेवेसाठी ‘ऑक्सिजन काॅन्सट्रेटर’ यंत्र भेट देण्यात आले.रविवार,दिनांक १४ डिसेंबर रोजी या केंद्राच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत हे यंत्र सुपूर्द करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी रोटरीचे अध्यक्ष पद्माकर सेलमोकर होते.आशा आयसीयुचे संचालक डॉ.एन.पी.देशपांडे,रोटरीचे सचिव पुरूषोत्तम वाघ,योगेश्वरी रोटरीचे माजी अध्यक्ष एस.बी. सय्यद,सदाशिव सोनवणे,डॉ.दिलीप खेडगीकर,या केंद्राचे संचालक डॉ.शुभदा लोहिया,डॉ.नवनाथ घुगे,डॉ.राहुल धाकडे यांची उपस्थिती होती.योगेश्वरी रोटरीने दिलेले हे यंत्र अत्यवस्थ रूग्णांसाठी खुप महत्वाचे आहे.ऐनवेळी ऑक्सिजन सिलेंडर संपले तर हे यंत्र रूग्णांसाठी फायदेशीर ठरते.आमचे केंद्र त्याचा योग्य वापर करू असे आश्वासन आयसीयुच्या संचालकांनी दिले.यावेळी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीचे माजी अध्यक्ष एस.बी. सय्यद,डॉ.एन.पी.देशपांडे,डॉ.शुभदा लोहिया,डॉ.नवनाथ घुगे,डॉ.राहूल धाकडे यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप करताना रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीचे अध्यक्ष पद्माकर सेलमोकर म्हणाले की,रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरी हा सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवतो.आशा आययसीयु केंद्राचे आरोग्य क्षेत्रातील कार्य हे प्रेरक आहे.गोरगरीब,गरजू व अत्यवस्थ रूग्णांना जीवनदान देणारे आहे.त्यांच्या या समाजोपयोगी व विधायक कार्याची नोंद घेवून आशा आयसीयु अतिदक्षता व संशोधन केंद्रास रूग्णांच्या सेवेसाठी ‘ऑक्सिजन काॅन्सट्रेटर’ यंत्र भेट देण्यात येत आहे.या प्रसंगी योगेश्वरी रोटरीचे सदस्य वामनराव जोशी यांनी पद्माकर सेलमोकर यांच्या कार्याचे व योगेश्वरी रोटरीच्या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.योगेश्वरी रोटरीचे सदस्य तथा पञकार प्रशांत बर्दापूरकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष पांडुरंग पाखरे,सदस्य वामनराव जोशी,विश्वनाथ गिरगिरवार,राजाराम पोतदार यांच्यासह विजयकुमार विर्धे उपस्थित होते.