अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.मुख्य प्रशासकपदी गोविंदराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
शनिवार,दिनांक 19 डिसेंबर 2020 रोजी नवनियुक्त प्रशासक मंडळाकडे अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था अधिकारी व्हि.एल.पोतंगले यांनी पदभार हस्तांतरीत केला.यावेळी मुख्य प्रशासकपदी गोविंदराव देशमुख, आमदार संजयभाऊ दौंड,माजी आमदार पृथ्वीराज साठे,बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,बीड जिल्हा परीषदेचे अध्यक्ष शिवाजीराव सिरसाट,अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष दत्ताञय आबा पाटील,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे,सर्व नुतन प्रशासक,रणजित चाचा लोमटे,अजित गरड,विश्वंभर फड, बाळासाहेब सोनवणे, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, गौतम चाटे, अशोकराव गाढवे, प्रभारी सचिव महेंद्र जाधव आदींसह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक मंडळ
===================
अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक मंडळाच्या मुख्य प्रशासकपदी गोविंद बाळासाहेब देशमुख (घाटनांदूर) तर प्रशासक म्हणून अर्जुन गोविंदराव वाघमारे(अंबाजोगाई),शेख अल्ताफ अबरार(पिंपळा धायगुडा),अमर दगडूसाहेब देशमुख (माकेगाव),माणिकराव पाटलोबा कातकडे (कातकरवाडी),विलास दामोदरराव मोरे (बर्दापूर),आबासाहेब अप्पासाहेब पांडे (धानोरा बु.),दत्ताञय लक्ष्मण यादव (तळेगाव घाट), सौ.रीना सत्यजित सिरसाट (वालेवाडी), प्रकाश बालचंद सोळंकी (अंबाजोगाई) यांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीच्या प्रशासक मंडळाकडून आभार
====================
यावेळी अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था अधिकारी व्हि.एल.पोतंगले यांनी पदभार हस्तांतरीत केल्यानंतर सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त मुख्यप्रशासक गोविंद देशमुख म्हणाले की,अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक मंडळाचे मुख्य प्रशासक म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल तसेच प्रशासक पदावर महाविकास आघाडीच्या सर्व घटकांना सामावून घेतल्याबद्दल नुतन मुख्यप्रशासक गोविंद देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब,सामाजिक नन्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे आणि सहकार,पणन व वस्ञोद्योग मंञी ना.बाळासाहेब पाटील,आमदार संजयभाऊ दौंड,माजी आमदार पृथ्वीराज साठे,बीड जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सीधर आण्णा सिरसाट आदी नेत्यांचे आभार मानले आहेत.