कडा:शेख सिराज― आष्टी तालुक्यातील कडा गावचे सामाजिक कार्यकर्ते सय्यद रहेमान सय्यदअली यांना राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार २०२० जाहीर झाला आहे. सय्यद रहेमान यांनी कडा गावातील दलितवस्तीतील सार्वजनिक शौचालयाच्या अर्धवट सोडलेले कामे पुर्ण करण्यात यावे यासाठी एक आगळेवेगळे टरमाळे आंदोलन केले होते.असेच सामाजिक प्रश्नावर कित्येकदा आंदोलने,आमरण उपोषणे,लाक्षणिक उपोषणे,धरणे आंदोलने, करून त्यात यशही मिळवले आहेत.इतर ही अनेक प्रकारे ते सामाजिक कार्य नेहमीच करत रहातात.त्यांना यावर्षी २०२० चा राज्यस्तरीय कुशल नेतुत्व जननायक लोकगौरव पुरस्कार जाहीर झाला असुन याबद्दल सय्यद रहेमान यांना कालिदास अपेट राज्यकार्यध्यक्ष शेतकरी संघटना, शेख अजिमोद्दिन शे.सं.जिल्हाध्यक्ष बीड, शंकर देशमुख भा.ज.पा.सचिव बीड जिल्हा,राम बोडखे सरंपच सराटेवडगाव, प्रमोद (बंटी) गायकवाड, अन्सार सय्यद बाळासाहेब देशमुख, रमेश देशमुख, सचिन शिंदे ग्रा.प.सदस्य कडा, सागर बोराटे,अविनाश ढोबळे,अल्ताब शेख पप्पु खेत्रे यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.