28 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्ष साजरा करणार 136 वा स्थापना दिवस

Last Updated by संपादक

काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे आवाहन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― काँग्रेस पक्षचा सोमवार,दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी 136 वा स्थापना दिवस आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आपला स्थापना दिवस साजरा करणार आहे.तरी या निमित्ताने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे आवाहन

या विषयी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे सुचनेवरून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका,शहर,ग्रामीण भागात सोमवार,दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी 136 वा कॉंग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा करणार आहोत.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये व त्यानंतर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्षाने दिलेले योगदान अत्यंत महत्वाचे आहे.मा.प्रांताध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून आपणांस कळविण्यात येते की,सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवार,दिनांक 28 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ब्लॉक मध्ये काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन साजरा करायचा आहे.या निमित्ताने ध्वजारोहण,भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येईल.तसेच भाजपा सरकारने पारीत केलेल्या कृषि विधेयकांचा विरोध व निषेध करून दिल्ली येथील किसान आंदोलनाला बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पाठींबा दर्शविण्यात येणार आहे.या प्रसंगी आपल्या भागातील काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय आजी, माजी प्रदेश,जिल्हा, तालुका पदाधिकारी यांना सदर कार्यक्रमासाठी निमंत्रित करावे.कोवीड-19 संदर्भातील सर्व नियम या प्रसंगी पाळावेत.सदरील कार्यक्रमात बीड जिल्हा काँग्रेस,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस, सेवादल,अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्यांक सेल, ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सन्मानिय नेते,जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.