बीड:आठवडा विशेष टीम― कर नाही त्याला डर कशाला, म्हणणाऱ्या भाजपाच्या 105 आमदारांची व महाराष्ट्रातील भाजपा खासदारांची ईडी मार्फत चौकशी व्हावी.भट भीक्षुकांचा पक्ष ते बहुजनांचा पक्ष अशी ओळख लोकनेते स्व. मा. गोपीनाथजी मुंडे साहेब, मा. एकनाथराव खडसे मा. फुंडकर साहेब यांनी निर्माण करून दिली होती. परंतु अहंकारी फडणवीस साहेबांनी ही ओळख नष्ट करण्याचे सर्व प्रयत्न केले आहेत.
यासाठी त्यांनी मुख्यमंत्री स्पर्धेत असलेले सर्व ओबीसी नेते संपवण्याचे प्रयत्न केले त्यामुळे त्यांनी सर्व ओबीसी नेते, मित्र पक्ष संपवून पेशवाई लादण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.ते एवढ्यावर थांबले नाहीत तर केंद्रात गैरसमज घडवून ईडी,सीबीआय इनकम टॅक्स याचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना धमक्या देऊन पक्ष प्रवेश करून घेतले. काँग्रेस मुक्त भाजपा करण्याची घोषणा करणारा भाजपा काँग्रेसयुक्त करून टाकली आहे.
यामुळे भाजपा ब्लॅकमेल करून पक्ष वाढवत आहे असा गैरसमज सर्वसामान्य जनतेत पसरला आहे.
त्यामुळे भाजपच्या 105आमदारांचीही ईडी मार्फत चौकशी व्हावी. कर नाही तर डर कशाला, त्यामुळे सतत ईडी सीबीआय, इनकम टॅक्स चौकशीची मागणी करणारे भाजपा नेतेही याला विरोध करणार नाहीत. यामुळे दुध का दुध व पाणी का पाणी होईल. यामुळे पार्टी विथ डिफरन्स हेही आणखी पारदर्शक होईल. याबाबत आजच पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून भाजपा 105 आमदारांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे स्वातीताई मोराळे ,राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी फौंडेशन इंडिया यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळवले आहे.