सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― चाळीस ग्रामपंचायतीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अंतिम दिवशी बुधवारी ९८६ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यावर गुरुवारी या नामनिर्देशन पत्रांची २० टेबलवर पाच फेऱ्यांत छाननी करण्यात आली होती यामध्ये ९५३ उमेदवार पात्र तर ३३ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र अपात्र घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे छाननीच्या दिवशी ३६५ जागांसाठी ९५३ उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र गुरुवारी स्पष्ट झाले होते या छाननीत मात्र जिल्हाधिकारी औरंगाबाद यांचा २०१५ मध्ये निवडणुका लढविल्यावर निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या ३० उमेदवारांना या निर्णयाचा फटका बसल्याने निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या ३० जणांना निवडणुकीतून बाद ठरविण्यात आले असून उर्वरित तिघांना शिक्षण,वय आणि जात पडताळणी आदी कारणांमुळे अपात्र ठरविल्याची कारवाई पदसिद्ध अधिकारी प्रवीण पांडे यांनी केली आहे.
चाळीस ग्रामपंचायतीसाठी ९५३ उमेदवार―
सोयगाव तालुक्यात छाननीच्या दिवशी गुरुवारी ९५३ नामनिर्देशन पत्र पात्र ठरविण्यात आल्याने तूर्तास तरी ३६५ जागांसाठी ९५३ उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र असले तरी मात्र दि.४ पर्यंत होणाऱ्या माघारी नंतर सोयगाव तालुक्यातील चित्र आणखीनच स्पष्ट होणार आहे.