अंबाजोगाई (प्रतिनिधी):जिल्हा परिषदेतील शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करण्यासाठीच्या नियमांतील दोन अटी रद्द करण्याचे आदेश शासनाने दिलेले असताना ही त्रुटी दाखवून अडवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.शिक्षक मैञी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा रापतवार यांनी या प्रकरणात शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी तात्काळ लागू करून लाभ द्यावा अशी मागणी केली आहे.
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रकरणी बोलताना शिक्षक नेते विजयदादा रापतवार यांनी सांगितले की,शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करण्यासाठी 21,10 व 40 दिवसांच्या प्रशिक्षणाची अट होती.शिवाय शाळेतील भौतिक सुविधेचाही मुद्दा होता.परंतु,शिक्षक संघटनांनी या अटी रद्द करण्याची मागणी शासनाकडे लावून धरली होती.त्यानंतर 26 ऑगस्ट 2019 रोजी प्रशिक्षणाची तर 21 डिसेंबर 2018 रोजी भौतिक सुविधेची अट शासनादेशाद्वारे रद्द करण्यात आलेली आहे.मात्र,बीड जिल्हा परिषदेकडून वरिष्ठ व निवडश्रेणीचा लाभ देण्यासाठी वरील दोन अटींची पूर्तता करण्याची मागणी होत आहे.यावरून 17 डिसेंबर रोजी काही शिक्षकांचे प्रस्ताव देखील फेटाळून लावले आहेत.अशी माहिती आता समोर येत आहे.असे होवू नये अशी विनंती आपण शिक्षणाधिकारी (प्रा.) यांना भेटून शिक्षक मैञी प्रतिष्ठानचे वतीने निवेदन देवून करणार आहोत.तसेच शिक्षणाधिका-यांची भेट घेऊन त्यांनाही शासनादेशाची अंमलबजावणी करण्याविषयी बोलणार आहोत.त्यामुळे या प्रकरणी बीड जिल्ह्यातील जिल्हा परीषद शिक्षकांना यापुढे वरिष्ठ व निवडश्रेणीचा लाभ द्यावा अशी मागणी विजयदादा रापतवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.
शासन आदेशाची अंमलबजावणी करा
====================
शासनाने आदेश काढून ज्या अटी रद्द केलेल्या आहेत.त्या अटींची पूर्तता करण्यासाठी बीड जिल्हा परिषद अडून बसली आहे.प्रसंगी या संदर्भात आपण शिक्षकांच्या वतीने शिक्षणाधिका-यांना भेटून निवेदन देणार आहोत.शासन आदेश डावलून शिक्षकांची अडवणूक होत असेल तर ते चुकीचे आहे.शासन आदेशाची अंमलबजावणी करून शिक्षकांना लाभ द्यावा.
―विजयदादा रापतवार (अध्यक्ष,शिक्षक मैञी प्रतिष्ठान,अंबाजोगाई.)