पत्रकारीतेचे बदलते स्वरूप विकासाला पोषक-अमर हबीब
दर्पण दिन; पत्रकार संघ अंबाजोगाईच्या पुरस्कारांचे वितरण
अंबाजोगाई (प्रतिनिधी):
पत्रकार संघ,अंबाजोगाई यांच्या वतीने दिला जाणारा कै.भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अशोकराव देशमुख (बीड) यांना तर कै.धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार पत्रकार प्रतापराव नलावडे (बीड) यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.दर्पण दिन व पुरस्कार वितरण सोहळा बुधवार,दि.6 जानेवारी 2021 रोजी अंबाजोगाईत आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा,बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय दमकोंडवार,सचिव रणजित डांगे यांच्या हस्ते व उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार करण्यात आले.बुधवार,दि.6 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 6.00 वाजता नगरपरिषद मिटिंग हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कै.भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अशोकराव देशमुख (बीड) तर कै.धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार पत्रकार प्रतापराव नलावडे (बीड) यांना प्रदान करण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप शाल,फेटा,पुष्पहार व स्मृतीचिन्ह असे होते.यावेळी मान्यवरांसोबत उपस्थित असलेले संजय तिपाले,व्यंकटेश वैष्णव,राजेश खराडे,सचिन नलावडे यांचे व कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पत्रकार संघ अंबाजोगाईच्या वतीने करण्यात आले.या प्रसंगी बोलताना आ.नमिताताई मुंदडा यांनी पत्रकारितेतील नवे प्रवाह,बदलते तंत्रज्ञान या बाबतीची माहिती दिली.पत्रकारांनी नव्या पिढीला मार्गदर्शन केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.कोरोना काळात एका योद्धासारखे कार्य करून पत्रकारांनी जीव धोक्यात घातला.या बद्दल पत्रकारांचे आभार मानले.पत्रकारीतेची शक्ती काय असते.या बाबत भाष्य केले.प्रसार माध्यमांची विश्वासहर्ता कायम असल्याचे सांगुन आ.मुंदडा यांनी पत्रकार हे लोकशाहीचे आधारस्तंभ असल्याचे सांगुन पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवर पत्रकारांचे अभिनंदन केले.यावेळी बोलताना बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत पत्रकार संघ अंबाजोगाई कार्य करीत आहे.अंबाजोगाईच्या पत्रकारांची विश्वासहर्ता कायम असल्याचे सांगुन शहराच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची मदत होते.ज्येष्ठ पत्रकार अशोकराव देशमुख व प्रतापराव नलावडे यांची पुरस्कारासाठी योग्य निवड केल्याचे मोदी म्हणाले.पत्रकारांचे आपणास सातत्याने सहकार्य मिळते.आपल्या यशात व अंबाजोगाईच्या सर्वांगिण विकासात पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचे राजकिशोर मोदी म्हणाले.यावेळी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकार बांधवांचे अभिनंदन केले.आपण सदैव पत्रकारांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.दर्पण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.पत्रकार संघाचे विश्वस्त अशोकराव गुंजाळ यांनी आपल्या मनोगतात जुने किस्से सांगितले तसेच नव्या पिढीतील पत्रकारांनी शोध पत्रकारिता करावी असे आवाहन केले.यावेळी सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार अशोकराव देशमुख यांनी पत्रकारांनी विश्वासहर्ता,प्रामाणिकपणा जोपासावा,बातमीसाठी
चांगल्या भाषेचा वापर करावा,वाईट भाषा वापरू नये,नव्या पिढीला उभे करण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच यावेळी बोलताना वृत्तसंपादक प्रतापराव नलावडे म्हणाले की,ग्रामिण पत्रकारीतेने कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावली व प्रींट मिडीयाचे अस्तित्व टिकवले.तसेच त्यांनी यावेळी पत्रकारांचे समाजातले महत्व आणि पत्रकार नसते तर काय झाले असते.या बाबत भाष्य केले.या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रमुख अतिथी डॉ.शिवाजीराव सुक्रे यांनी दर्जेदार रुग्णसेवा करताना आपणांस पत्रकार बांधवांचे सहकार्य मिळत असल्याचे नमुद केले.अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी पत्रकारांना मौलिक मार्गदर्शन केले.पत्रकारांनी वाचन केले पाहिजे,पत्रकार बहुभाषीक असला पाहिजे,बदलत्या काळानुसार पत्रकारांना नवे बदल स्विकारून विधायक व सकारात्मक पत्रकारीता करता आली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दिपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि मठपती तसेच पाहुण्यांचा परिचय प्रशांत बर्दापुरकर यांनी करून दिला.तर सुत्रसंचालन शिवकुमार निर्मळे यांनी करून उपस्थितांचे आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय दमकोंडवार यांनी मानले.यावेळी पत्रकार नागेश औताडे संपादीत श्री.योगेश्वरी दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पत्रकार संघ अंबाजोगाईचे विश्वस्त अमर हबीब,प्रा.नानासाहेब गाठाळ,अशोकराव गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय दमकोंडवार,अविनाश मुडेगावकर,अभिजीत गाठाळ,शिवकुमार निर्मळे,प्रशांत बर्दापुरकर,प्रकाश लखेरा,रमाकांत पाटील,रवि मठपती,रणजित डांगे, राहुल देशपांडे,रमाकांत उडाणशिव,अभिजीत गुप्ता,नागेश औताडे,ज्ञानेश मातेकर,संतोष बोबडे,विजय हामिने, अशोक कदम, देविदास जाधव,शेख वाजेद,सालम पठाण, वसुदेव शिंदे,अशोक कचरे,जयराम लगसकर,प्रमोद बिडवई आदींसह इतरांनी पुढाकार घेतला.या कार्यक्रमास अक्षय मुंदडा,नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक संजय गंभीरे,नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक खलील मौलाना,नगरसेवक संतोष शिनगारे,नगरसेवक दिनेश भराडीया,नगरसेवक बाला पाथरकर,नगरसेवक ताहेरभाई,माजी नगरसेवक डॉ.राजेश इंगोले,प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे,प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे,प्रा.शरदराव हेबाळकर,सौ.शरयूताई हेबाळकर,उद्धवबापु आपेगावकर,वसंतराव मोरे,डॉ.निशीकांत पाचेगावकर,डॉ.नवनाथ घुगे,एस.बी.सय्यद,प्रविण ठोंबरे,गोविंद पोतंगले,राजेश रेवले, चंदन कुलकर्णी,मुजीब काझी,वसंतराव चव्हाण,सी.व्ही.गायकवाड,आनंद टाकळकर,अॅड.संतोष पवार,प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे आदींसह शिक्षण,समाजसेवा,पञकारीता,विधी,व्यापार,सहकार आणि प्रशासन या क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.