पुणे:आठवडा विशेष टीम― राज्यात आज बुधवारी (१४ एप्रिल २०२१ ) रात्री ८ वाजल्यापासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्यामुळे संचारबदी असणार आहे. मागील वर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांच्या संचारावर कडक निर्बंध होते. पासशिवाय लोकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेशास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे आता लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन सदृश्य निर्बंधामध्ये सुद्धा हा नियम लागू असेल का, वैयक्तीक गाडीचा वापर करता येईल का?, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पास लागेल का? असे प्रश्न विचारले जात होता. यावर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी स्पष्ट केली कि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पासची आवश्यकता नसेल शिवाय तुम्हाला अत्यावश्यक कारणासाठी वैयक्तीक गाडीचा वापर करता येईल.
पोलिस महासंचालक संजय पांडे म्हटले कि, अत्यावश्यक कारणासाठी वैयक्तीक गाडीचा वापर करता येईल. शिवाय आपत्कालीन कामासाठी कोणत्याही पासची गरज असणार नाही. मागच्या वेळेस पासची सिस्टिम होती, तसेच त्याची तपासणी काटेकोरपणे होत होती. पण, यावेळी पासची कोणतीही गरज लागणार नाही. अत्यावश्यक कामासाठी कोणी बाहेर पडत असेल, तर त्याला कोणताही त्रास होणार नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पासची गरज नाही.
पुढे ते म्हटले कि, आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही याची हमी देतो, पण जाणूबुजून संचारबंदीचा भंग करून आम्हाला लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका. जर खरोखर काम असेल तर हरकत नाही. पण कारण नसताना बाहेर पडल्यास कारवाई होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.