अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने राज्यासह बीड जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी लागू केली आहे.तरी जनतेने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विनाकारण घराबाहेर पडू नये,शासन निर्देश पाळावेत आणि उस्फुर्तपणे जनता कर्फ्यु पाळून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन अंबाजोगाई नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,नगरसेवक बबनराव लोमटे,नगरसेवक कमलाकर कोपले यांनी केले आहे.
राज्य,बीड जिल्ह्यासह अंबाजोगाईत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सरकारने संचारबंदी लागू केली आहे.प्रशासनाने घालून दिलेले ‘ब्रेक-द-चेन’ चे नियम पाळा,विनाकारण घराबाहेर पडू नका,त्यामुळे जनतेने सहकार्य करावं. पोलिस प्रशासनाच्या वतीने राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनीही नुकतेच आवाहन केले आहे की,आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही याची हमी देतो.पण,जाणूनबुजून संचारबंदीचा भंग करू नका,राज्यात १४४ कलम लागू आहे.त्यामुळे ५ पेक्षा जास्त लोकांनी घराबाहेर पडू नये.जर खरोखरच काम असेल आणि कोणी घराबाहेर पडलं असेल तर हरकत नाही.जाणूनबुजून नियमभंग करू नका अतिउत्साहीपणा दाखवू नका असे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितले आहे त्यामुळे जनतेने या आवाहनाला प्रतिसाद द्यावा,तसेच बीड जिल्ह्यासह अंबाजोगाईत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झालेला आहे.कारण,दररोजच शेकडोंच्या पटीत कोरोना बाधितांची संख्या ही वाढत आहे.आरोग्य यंंत्रणेत काम करणारे डॉक्टर,कर्मचारी,नर्स हे आपले बंधू आणि भगिनी आहेत,अहोरात्र ही सर्व यंत्रणा आपल्यासाठी जीवाची बाजी लावून काम करीत आहेत.तरी याची जाणिव ठेवून आपण कोरोना संसर्ग वाढणार नाही याची काळजी घेवूत,आपण व आपले कुटूंबिय कसे सुरक्षित ठेवता येईल,घरातील वयोवृद्ध नागरिक,लहान मुले,मित्र व नातेवाईकांना कोरोना संसर्ग होणार नाही.याची काळजी कशी घेता येईल हे पाहणे महत्वाचे आहे.आपला स्वताःचा जीव धोक्यात घालून विनाकारण घराबाहेर फिरू नका,कोरोना पार्श्वभुमीवर नियमित मास्क व सॅनिटायझर वापरा,वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावेत,सुरक्षित अंतर ठेवावे,सार्वजनिक ठिकाणी खरेदी किंवा अन्य कामांसाठी गर्दी करू नये या नियमांचे पालन केले तर आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो.खुपच महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा.अन्यथा पडू नका,सध्याची परिस्थिती कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झालेली आहे.त्यामुळे सर्वांनी नियम पाळा.अंबाजोगाई नगरपरिषद,आरोग्य विभाग,महसूल विभाग,पोलीस बांधव व सर्व शासकीय यंत्रणा या संकटकाळात आपल्यासोबत उभे आहेत.आजार अंगावर काढू नका,किरकोळ लक्षणे जाणवताच दवाखान्यात जावून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व योग्य औषधोपचार घ्यावेत, सरकारच्या आदेशाचे पालन करा.मोठ्या देशांनी देखील यावर्षी ही लॉकडाऊन केलंय.आपल्याला ते नवं नाही.आपण सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केलं तर येत्या १५ दिवसांत कोरोनाचे आकडे कमी होतील असे वाटते.त्यामुळे अंबाजोगाईकर जनतेनं मागील वर्षीप्रमाणे यापुढील काळात ही कायद्याचा आदर व लॉकडाऊनचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे,ऊस्फुर्तपणे जनता कर्फ्यु पाळावा असे आवाहन अंबाजोगाईचे प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,नगरसेवक बबनराव लोमटे,नगरसेवक कमलाकर कोपले आदींनी केले आहे.