पालकमंञी ना.धनंजय मुंडेंमुळे अंबाजोगाईचे स्वा.रा.ती.रूग्णालय होणार ऑक्सिजन बाबतीत आत्मनिर्भर

स्वा.रा.तीला नविन ऑक्सिजन प्लँट मंजूर केल्याबद्दल माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी मानले पालकमंञ्यांचे आभार

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― कोरोनाचा वाढलेला प्रभाव यामुळे आरोग्य सेवेवरील ताण कमी होवून रूग्णांना तत्पर औषधोपचार व ऑक्सिजन उपलब्ध व्हावेत यासाठी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंञी ना.धनंजयभाऊ मुंडे हे सातत्याने काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहेत.या संवेदनेतून २४ तासात १६६ जम्बो सिलेंडर तयार होणारा थर्मल पॉवर स्टेशनला बसणारा ऑक्सिजन प्लॅन्ट आता अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती.मध्ये बसविण्यात येणार आहे व सदरील प्लॅन्ट उभारणीचे काम उद्यापासून सुरू होणार आहे.या ऑक्सिजन प्लँटमुळे रूग्णांना ऑक्सिजनची सुविधा तर नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.त्याबद्दल केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी जनतेच्या वतीने पालकमंञी ना.धनंजय भाऊ मुंडे व आमदार संजयभाऊ दौंड यांचे आभार मानले आहेत.

पालकमंञी ना.धनंजयभाऊ मुंडे यांचेमुळे अंबाजोगाईचे स्वा.रा.ती.रूग्णालय यापुढे ऑक्सिजन बाबतीत आत्मनिर्भर होणार आहे.कारण,पालकमंञी ना.मुंडे यांनी अंबाजोगाईतील स्वा.रा.तीला नविन ऑक्सिजन प्लँट मंजूर केला आहे.२४ तासात १६६ जम्बो सिलेंडर तयार होणारा थर्मल पॉवर स्टेशनला बसणारा ऑक्सिजन प्लॅन्ट आता अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती.मध्ये बसविण्यात येणार आहे व सदरील प्लॅन्ट उभारणीचे काम उद्यापासून सुरू होणार आहे.या प्लँट बाबत माहिती देताना माजी आमदार पृथ्विराज साठे यांनी सांगितले की,पालकमंञी ना.धनंजयभाऊ मुंडे यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा होवू नये म्हणून अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकिय रूग्णालय परीसरातील 'ए' बिल्डिंग इमारतीच्या उत्तरेस ऑक्सिजन प्लँट मंजूर केला आहे.जागेची पाहणी करण्याकरीता पालकमंञ्यांनी गुरूवार,दिनांक १५ एप्रिल रोजी एक पथक पाठवले होते.जागेची पाहणी करून उद्यापर्यंत ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी लागणारी सर्व सामुग्री उपलब्ध होणार असून पुढील १५ दिवसांच्या आत सदरील ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित होईल.सदरील प्लँटची क्षमता स्वा.रा.ती.च्या आवश्यकतेनुसार आहे.स्वा.रा.ती.रूग्णालयाचे विद्यमान अधिष्ठाता,त्यांचे सर्व सहकारी,कर्मचारी वर्ग हे मागील अनेक महिन्यांपासून रूग्णांना तत्पर व अविरत आरोग्य सेवा देत आहेत.स्वा.रा.ती. तसेच लोखंडी सावरगाव येथील कोविड रूग्णालयास उपचारांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य,यंञणा पुरविण्याचे काम जिल्ह्याचे पालकमंञी यांच्या मार्गदर्शनाखाली बीडचे जिल्हाधिकारी व सर्व प्रशासकीय यंञणा प्रभावीपणे करीत आहेत.या सर्वांचेही मनापासून आभार.कोरोना संकटकाळ लक्षात घेता प्रशासनातील प्रत्येक घटक हा आज गांभीर्यपूर्वक काम करीत आहे,कोरोनाविरूद्धची ही लढाई निकराची असून,पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे आहेत.बीड जिल्ह्यासह केज मतदारसंघात कुठेही बेड,ऑक्सिजन,
व्हेंटिलेटर्स,रेमडीसीविर किंवा अन्य आरोग्य विषयक कोणत्याही बाबींची कमतरता भासणार नाही,यासाठी सर्व प्रशासन मिळून प्रयत्न करीत आहे.तसेच बीड जिल्ह्याला ऑक्सिजनच्या बाबतीत पुन्हा एकदा आत्मनिर्भर बनवून,जिल्ह्यात कुठेही एक लिटर ऑक्सिजन देखील कमी पडणार नाही,अशी खात्री ना.मुंडेंनी जिल्ह्याला दिली आहे.तर दुसरीकडे रेमडीसीविर या इंजेक्शनचा तुटवडा भासू नये,साठेबाजी व काळाबाजार होवू नये असे प्रकार उघडकीस आल्यास त्याच्यावर प्रभावी यंत्रणा राबवून नियंत्रण समिती स्थापन करावी,ज्यांना आवश्यक त्यांनाच इंजेक्शन व तेही रूग्णालयामार्फत ही प्रणाली तातडीने विकसित करावी.जिल्ह्यात आलेले इंजेक्शन व वितरण याचे दररोज ऑडिट या यंत्रणेमार्फत केले जावे,लोखंडी सावरगाव कोविड सेंटर येथील बेड संख्या मागील काही दिवसांत रूग्ण संख्या आटोक्यात आल्याने कमी करण्यात आली होती,मात्र आताची रूग्णसंख्या पाहून, ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेडसची संख्या तातडीने वाढविण्यात यावी,बेडची संख्या कमी पडत असेल तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील खाजगी रूग्णालये ताब्यात घेऊन तिथे सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश ही पालकमंञी ना.धनंजयभाऊ मुंडे यांनी प्रशासनास दिले आहेत अशी माहिती माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी देवून पालकमंञी ना.धनंजयभाऊ मुंडे व आमदार संजयभाऊ दौंड यांचे आभार मानले आहेत.


Previous post सर्व रुग्णालयांनी ऑक्सीजनचा सुयोग्य वापर करण्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे निर्देश
Next post लॉकडाऊन पार्श्वभूमीवर देण्यात येणा-या आर्थिक पॅकेजमध्ये बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार बांधवांचा समावेश करावा – राजकिशोर मोदी