अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

लॉकडाऊन पार्श्वभूमीवर देण्यात येणा-या आर्थिक पॅकेजमध्ये बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार बांधवांचा समावेश करावा – राजकिशोर मोदी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमुळे गतवर्षी बेरोजगार झालेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली.या काळात गावगाडा हाकणा-या बारा बलुतेदार व आठरा आलुतेदारांचेही प्रचंड हाल झाले.या वर्गाकडे केंद्र सरकारने आणि समाज व्यवस्थेनेही लक्ष दिले नाही.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजपासून हा वर्ग तर कोसोदुरच राहिलेला आहे.त्यामुळेच लॉकडाउन नंतरच्या काळात या वर्गावर बिकट परिस्थिती ओढवू नये म्हणून लॉकडाऊन पार्श्वभूमीवर देण्यात येणा-या आर्थिक पॅकेजमध्ये बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार बांधवांचा समावेश करावा अशी जाहीर मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली आहे.

मागील वर्षांपासून राज्यासह बीड जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने अतिशय उत्तम रितीने परस्थिती हाताळली.यावेळेस ही राज्याचे मुख्यमंञी मा.उध्दवजी ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, पालकमंञी ना.धनंजयजी मुंडे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेतृत्वाने लॉकडाऊन पार्श्वभूमीवर देण्यात येणा-या आर्थिक पॅकेज मध्ये बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार बांधवांचा समावेश करावा,पूर्वी ग्रामीण भागात वस्तु-विनिमय पद्धत होती.या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता.शेतकरी धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतक-यांस व इतरांना इतर सेवा पुरवीत.यामध्ये जे शेतक-यांच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवित त्यांना अलुतेदार तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार असे म्हटले जात.हे गावाचे वतनदार असत आणि पिढ्या न पिढ्या तेच ठरावीक काम करीत. बारा बलुतेदारांमध्ये कुंभार,कोळी,गुरव, चांभार,मातंग,तेली, न्हावी,परीट,माळी, महार,लोहार,सुतार या वर्गांचा समावेश होता. हिंदूंप्रमाणे मुस्लिमांमध्येही बारा बलुतेदारांचा अंतर्भाव होता.त्यात आतार, कुरेशी,छप्परबंद, तांबोळी,पिंजारी- नदाफ,फकीर, बागवान,मदारी,मन्यार,मोमीन, मिसगर,शिकलगार आदी बारा जातींचा समावेश आहे.लॉकडाऊननंतर बाजारपेठा हळूहळू सुरू होतील.मात्र,रोटीच बंद झालेल्या गावगाडा हाकणा-या बारा बलुतेदारांच्या घरच्या चुलीचा खरा प्रश्न आहे.बलुतेदारांपैकी शहरात आणि गाव खेड्यातील साळी,माळी,तेली, कुंभार,न्हावी,चांभार,शिंपी,सोनार,भोई, कोळी,रंगारी,धोबी, सुतार,लोहार,गवंडी या पारंपारिक व्यावसायिकांची दैना उडाली.विशेषतः हातावर पोट भरणा-या आहे.बलुतेदारांपैकी न्हावी,भोई,शिंपी, चांभार,परीट यांना मोठा फटका बसला आहे.सलुन व्यावसायीक,टेलरींग कारागीर,परीट,सुतार,लोहार,टोपली, केरसुणी तयार करून गावोगावी विक्री करणारे मातंग बांधव,चप्पल-बुट सांधणारे गटई कामगार,खारीमुरी-फुटाणे विकणारा भोई समाज,कोळी,कुंभार, सुवर्ण कारागीर आणि गावोगाव फिरून फुले जमवून हार आणि गुच्छ बनविणारे माळी बांधव,मंदिराची देखभाल करणारे गुरव बांधव,फळे विकून उपजिविका करणारे बागवान,गावोगावी -गल्ली बोळात बांगड्या विकणारे मनियार,गाद्या,दुलई तयार करणारे पिंजारी,यंत्रमागावर विणकाम करणारे जुलाहा (साळी) बांधवांचे लॉकडाऊनने अक्षरश: कंबरडेच मोडले आहे.आर्थिक पॅकेज देताना रोटी बरोबरच या सर्वांच्या रोजीचा ही एकत्रित विचार व्हावा असे वाटते.

बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार यांचा मदतीच्या आर्थिक पॅकेजमध्ये समावेश करावा

‘लॉकडाऊन’चा मागील अनुभव आपण घेतला आहे.समाजातील सर्व छोटे घटक,हातावर पोट असणारे लहान मोठे व्यावसायिक यांना मोठा आर्थिक फटका बसला.अनेकांचे रोजगार हिरावले,काहींनी मृत्युस कवटाळले.त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार यापैकी अनेकांवर उपासमारीची वेळ येवू नये.त्यांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात,आताच काही महिन्यांपूर्वीच तर काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरू झाले होते,तरीही परिस्थिती पूर्वपदावर यायला आणि भांडवलाची जुळवाजुळव करायला बराच वेळ लागेल असे वाटले होते.परंतू,पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.म्हणून लोकांचे प्राण वाचविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला नाविलाजाने पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत आहे.या सर्वच घटकांना पुन्हा मूळ प्रवाहात आणून त्यांना ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मोठे आर्थिक पॅकेज द्यावे,याचा थेट फायदा बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार यांना मिळला पाहीजे.

-राजकिशोर मोदी (जिल्हाध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमिटी.)

Back to top button