भाजपाचा विचार सर्वदूर पोहचविणाऱ्या ज्येष्ठांचा धर्मापुरी येथे सन्मान

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात भाजपाचा विचार सर्वदूर पोहचविणा-या ज्येष्ठ नेत्यांचा धर्मापुरी येथे सन्मान करून दिवंगत नेत्यांचे स्मरण करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाने नुकताच आपला स्थापना दिवस साजरा करून ४१ व्या वर्षात पदार्पण केले.या निमित्ताने प्रा.राम चौधरी धर्मापूरीकर यांनी बीड जिल्ह्यात भाजपाचा विचार सर्वदूर पोहचविणा-या ज्येष्ठ नेत्यांचा धर्मापुरी येथे सन्मान करून दिवंगत नेत्यांचे स्मरण केले.या बाबत आपले मत व्यक्त करताना प्रा.चौधरी म्हणाले की,भाजपा पक्ष विस्तारासाठी अनेकांनी आपले संपूर्ण आयुष्य पक्षासाठी दिले.वेळ प्रसंगी बलिदान ही दिले.त्यात भारतीय जनसंघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष तथा कलकत्ता विद्यापीठाचे कुलपती डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी,'एकात्म मानव दर्शन' हा सिध्दांत भारतीय समाजापुढे ठेवणारे पंडीत दीनदयाळजी उपाध्याय,भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी,ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी देशभर तर दिवंगत नेते प्रमोदजी महाजन,दिवंगत नेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी ही देशासह महाराष्ट्रात वाडी,वस्ती,तांडा आणि तळागाळातील लोकांपर्यंत भाजपा हा पक्ष पोहोचवला.तसेच बीड जिल्ह्यातील परळी व अंबाजोगाई तालुक्यात गाव खेड्यात जाऊन भाजपा पक्ष विस्तारासाठी योगदान देणारे दिवंगत रोकडोबा दादा फड यांचे मोठे योगदान आहे असे सांगून जुन्या जाणत्या, जेष्ठांच्या कार्याचे स्मरण करून भाजपा पक्ष स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.तर यावेळेस ज्येष्ठ नेते परमेश्वर दादा फड,रंगनाथराव घोडके,भास्करराव फड,महादेवराव फड, नामदेवराव पाटील, व्यंकटराव पाटील, रामराव फड,विश्वास बागमारे आदी मान्यवरांचा प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.


Previous post लॉकडाऊन पार्श्वभूमीवर देण्यात येणा-या आर्थिक पॅकेजमध्ये बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार बांधवांचा समावेश करावा – राजकिशोर मोदी
Next post कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची दृकश्राव्य प्रणालीद्वारे बैठक