कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास आर्थिक मदत द्या – महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) चे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
सद्य परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे बाधित रूग्णांचे रोजच मृत्यू होत आहेत.ही संख्या मोठी आहे.मृत व्यक्ती हा कुटुंबातील कर्ता पुरूष असल्याने सदर कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या संकटात आल्याने कुटुंबांचे हाल होत आहेत.उपासमार वाढली आहे.त्यामुळे कोरोनाने मृत पावलेल्या कुटुंबास पाच लाख रूपये अर्थसहाय्य करावे,घरगुती वीज ग्राहकांचे कोरोना काळातील बील माफ करण्यात यावे,दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दहा हजार रूपये आर्थिक मदत करण्यात यावी अशा मागण्या महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) चे बीड जिल्हाध्यक्ष वाजेद खतीब,सचिव संभाजी देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना सोमवार,दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनातून केल्या आहेत.सदरील निवेदन अंबाजोगाई येथील अपर जिल्हाधिकारी यांना माहितीस्तव देण्यात आले आहे.