पाटोदा:नानासाहेब डिडुळ―
पाटोदा येथील ग्रामीण हॉस्पिटल मध्ये आय सी यू विभाग सुरू करण्याची मागणी आज शिवसंग्राम तालुका अध्यक्ष सुशील तांबे यांनी निवेदनाद्वारे केली.पाटोदा हे तालुक्याचे ठिकाण असून येथील कोरोना चे गंभीर आजारी पेशंट साठी लागणारी कोणतीच व्यवस्था ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नाही. बीड हे पाटोदा येथून45 कि मी दूर आहे. अश्या मध्ये बीड येथे पटोड्याहून पाठवलेल्या रुग्णाची हेळसांड होते . वेळेवर ऑक्सिजन न मिळणे, बेड, व्हेंटिलेटर व इंजक्शन चा तुटवडा या मुळे कोरोणा पेशंट व त्यांच्या जीव मेटाकुटीला येतो. पाटोद्यात अद्यावत सिटी स्कॅन व सर्व सुविधायुक्त 20 बेड चे कोरोना रुग्णांना साठी आय सी यू उभरल्यावर पाटोद्यात रुग्णांवर उपचार होतील. या साठी पाटोदा शिवसंग्राम कडून ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला निवेदन देऊन महिन्याच्या आत आय सी यू युनिट उभे करावे जर 30 दिवसात आय सी यू युनिट झाले नाही तर शिवसंग्राम कडून ग्रामीण रुग्णालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा रुग्णालय प्रशासनाला देण्यात आला. यावेळी सोशल डितन्सिंग चे पालन करण्यात आले.यावेळी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष सुशील तांबे पवन अडागळे व कार्यकर्ते उपस्थित होते.