पाटोदा:नानासाहेब डिडुळ― कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मुंबई पुण्यासारख्या शहरांत थैमान घातला होता आता खेड़्यापाड़्यात पण धुमाकूळ घातला आहे.पहीलेच १५ त्यात १२ ची भर- आज मंगळवार रोजी धनगरजवळका येथे अॅन्टीजन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 12 जणांना करोणाची बाधा झाल्याचे आढळुन आले पाटोदा आरोग्य विभागाकड़ून करोणाची साखळी तोड़ण्यासाठी धनगरजवळका येथे जि.प.शाळा येथे कॅम्प आयोजित करण्यात आला होता या मध्ये दिवसभरात 145 जणांची अॅन्टीजन चाचणी करण्यात आली त्यात यापैकी 12 जण पाॅझीटीव्ह आले आहेत.
या कॅम्पसाठी गावचे सरपंच रामराव काळे, ग्रामसेविका प्रगती खेड़कर, आशा स्वयंसेविका आगे मॅड़म ,कुलदीप काळे , सचिन मेघड़ंबर यांचे सहकार्य राहीले.
तसेच आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ मयुरे शिंदे, डॉ.सुभाष भारती ,संजय काळुसे,वैभव येवले , सचिन दरेकर,अमोल दरेकर,ड़ाॅ. सुभाष, पंकज काळे, शिक्षक तांबे सर यांच्या निगरानी खाली कॅम्प पार पड़ेल.