शिवसंग्राम तर्फे पाटोदा येथे कोरोना टेस्ट साठी येणाऱ्या नागरिकांना मास्क चे वाटप

Last Updated by संपादक

बीड:नानासाहेब डिडुळ― पाटोदा येथे गरजू व्यक्तींना व ग्रामीण रुग्णालय पाटोदा येथे कोरोणा टेस्ट करण्यासाठी आलेल्या नागरिकांना मास्क चे वाटप शिवसंग्राम चे तालुकाध्यक्ष सुशील तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.
पाटोदा येथे कोरोना चे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे पाटोदा येथे मास्क शिवाय फीरणाऱ्या नागरिकांना व कोरोना टेस्टसाठी येणाऱ्या पाटोद्यातील सुजाण नागरिकांना मास्क वाटण्याचा उपक्रम काल शिवसंग्राम तर्फे राबवण्यात आला. यामध्ये ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना टेस्ट होऊन पॉझिटिव आलेल्या नागरिकांचाही समावेश होता. मास्क असतानाही पाटोदा येथे बरेच नागरी क मास्क घालत नाहीत त्यासाठी जनजागृती करून व धोरणाची माहिती देऊन पाटोदा तालुक्यातील प्रत्येक गावात मास्क वाटप करण्याचे उद्दिष्ट शिवसंग्राम पाटोदा ने आमदार विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून काल पाटोदा येथे 100 नागरिकांना मास्क चे वाटप करण्यात आले. यामध्ये रुग्णालयातील स्टाफ डॉक्टर्स यांची मदत घेण्यात आली. मस्का घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आव्हान शिवसंग्राम कडून करण्यात आले.