जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव तालुक्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शेती कामे करतांनाही कोरोन असंसार्गाच्या बाबतीत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून भुईमुग काढणीच्या कामांनी वेग घेतला आहे.कोरोन संसार्गाचे भान ठेवत शेती कामातही नियमांचे पालन करण्यात येत असल्याने शासनाच्या महसूल,पोलीस आणि आरोग्य विभागाची जनजागृती प्रभावी ठरली आहे.
सोयगाव तालुक्यात कोरोना संसर्गाची वाढ होत आहे.त्यामुळे नागरिक आता सजग झाले असून शेती कामातही शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे कडक पालन करतांना घोसला शिवारात एका कुटुंबातील सदस्य सामाजिक अंतर ठेवून भुईमुग काधानीचे काम करत आहे.या कुटुंबाने शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे घालून दिलेल्या नियमांचे पालन करून भुईमुग काधानीचे कामे हाती घेतल्याने हा आदर्श तालुकाभर डोळ्यासमोर ठेवून तालुक्यात शेतात या नियमांचे पालन करतांना मजूर आढळून येत आहे.त्यामुळे शासकीय यंत्रणांची जनजागृती सोयगाव तालुक्यात प्रभावी ठरली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
साखळी तोडण्यासाठी नियमांची सक्ती आवश्यक-
सोयगाव तालुक्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे सक्तीचे झाले असून तोंडाला मास्क,सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर व हात स्वच्छ धुणे आदी नियमांचे पालन होत असल्याचे शेती शिवारात आढळून येत आहे.