अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोनाच्या संकटात लोकप्रतिनीधींनी राजकारण न करता स्वा.रा.ती प्रशासन व जनतेला सर्वोतोपरी मदत व सहकार्य करावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात यावी, कोविड जनजागरण व टेस्टींग आणि लसीकरण याकडे ही विशेष लक्ष द्यावे. कारण,बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई तालुका व शहरात दररोज कोरोना रूग्णांची वाढती संख्या ही चिंता वाढविणारी आहे. कोरोनाच्या या संकटाचा सामना करतांना काँग्रेसचे कार्यकर्ते सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत. तसेच महामारीच्या या काळात कुठले ही राजकारण न करता सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनीधी या नात्याने आपण ही आपले सक्रीय योगदान देत स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकिय रूग्णालय प्रशासनास व रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना सहकार्य व मदत करण्याची भूमिका घ्यावी.लॉकडाऊन पार्श्वभूमीवर कायदे, नियमांचे पालन करणे,मास्क,सॅनिटायझर तसेच सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर राखणे याबाबत नागरिकांमध्ये जनजागरण करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः आपल्या भागात जास्तीत जास्त यादृष्टीने लसीकरण व्हावे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करतांना प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक यंत्रसामुग्रीचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा,यापुढे व्हेंटीलेटर तसेच ऑक्सीजन बेडस् मागण्याची वेळच येवू नये म्हणुन आतापासुनच काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागरण अतिशय महत्वाचे असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.आरोग्य व्यवस्था पुर्णपणे कोलमडलेली आहे.हा काही विरोधकांचा अपप्रचार आहे.मुळात मागील एक वर्षांपासून राज्याचे मुख्यमंञी उध्दवजी ठाकरे,उपमुख्यमंञी अजितदादा पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले, वैद्यकीय शिक्षण मंञी ना.अमित विलासरावजी देशमुख आणि बीड जिल्ह्याचे पालकमंञी ना.धनंजयभाऊ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाईत आरोग्य विभाग,महसूल विभाग,अंबाजोगाई नगरपरीषद आणि पोलिस प्रशासन हातात हात घालून अतिशय प्रभावीपणे काम करीत आहेत.स्वा.रा.तीचे अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे व त्यांचे सर्व सहकारी डाॅक्टर्स,परीचारिका,वॉर्ड बॉय अतिशय उत्तम काम करीत आहेत.रूग्णांना तत्पर व अविरत आरोग्य सेवा देत आहेत.त्याबद्दल जनतेच्या वतीने स्वा.रा.ती प्रशासनाचे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत.गरजू रूग्णांना आवश्यक ती मदत करावी,रूग्णवाहीका उपलब्ध नसल्यास वाहने उपलब्ध करून द्यावीत,चाचण्यांची संख्या वाढवावी, बाधितांचे मृत्यू होवू नयेत,गरजू रूग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन,ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्यात यावेत असे सांगत याबाबत आपण प्रशासनातील वरीष्ठांशी चर्चा करू असेही राजकिशोर मोदी म्हणाले.मदतकार्य असो वा सेवाकार्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे.कारण, लॉकडाऊन कालावधीत काँग्रेस पक्षाचे वतीने मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली,गरजू कुटूंबिय यांना किराणा साहित्य,अन्नधान्य वितरण,परप्रांतीय बांधवांना त्यांच्या राज्यात,मूळगावी जाण्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली,अर्थसहाय्य करण्यात आले.त्यामुळे आपल्या काँग्रेस पक्षाची ही ओळख यापुढेही कायम ठेवावी.कोरोना संकटकाळात अनेक स्वयंसेवी संस्था,काही दानशूर व्यक्ती,संघटना आणि राजकीय पक्ष देखिल बाधित रूग्णाचे कुटुंबिय आणि प्रशासनाला सहकार्य करीत आहेत त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.या संकटकाळात सर्वपक्षीय नेत्यांनी नागरिकांना जास्तीत जास्त मदत करावी,माञ याबाबत कोणते ही राजकारण न करता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जनजागरण,लसीकरण व चाचण्या याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.