गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्य भाजपाचे मुख्य प्रवक्ते : केशव उपाध्ये

बीड:आठवडा विशेष टीम―
महाराष्ट्र भाजपाच्या वर्तुळात केशव उपाध्ये हे नांव आज चर्चेत असले तरी इथपर्यन्त मजल गाठणाऱ्यांच्या मागे कठोर परिश्रम, त्याग आणि संघर्ष या गोष्टी निश्चित असतात.सोलापुर येथील गिरणी कामगाराचा मुलगा ज्यांना कुठलाही राजकिय वारसा नाही,निमित्त होत विधार्थी परिषद त्या माध्यमातून भाजपाचा संबंध.वयाची 47 वर्षे पुर्ण करतांना गत 20 वर्षांपासून त्यांचे पाय ध्येयवादी विचाराने प्रेरित होवून मुंबईत स्थिरावले.प्रदेश भाजपच्या मीडिया सेलची जबाबदारी आली आणि जोडीने स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांचे मिडीया प्रमुख म्हणुनही अनेक वर्षे काम सुरू राहिले.पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत, आता राज्य भाजपाचे मुख्य प्रवक्ते अशी जबाबदारी त्यांच्यावर असून विचारांशी निष्ठा आणि नेतृत्वासोबत योग्य सुसंवाद ठेवून डिजिटल माध्यम युगात केशवजी निभावत असलेली भुमिका तारेवरची कसरत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील,विरोधी पक्षनेते आ.देवेंद्रजी फडणवीस यांचा विश्वास संपादन करून पक्षाचा विचार आणि केंद्रातील सरकारची बाजू,योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे उत्कृष्ट कार्य सध्या त्यांच्या हातून घडते,शांत मनमिळावू स्वभावाने, विनोदी शैलीने लोकांची मने जिंकण्याचे कसब त्यांच्यात आहे,एक हाडाचा सामान्य कार्यकर्ता अस पण, म्हणता येईल.मोठ्या पदावर काम करत असले तरी गिरणी कामगाराचा मुलगा त्यांच्यातून बाजुला जात नाही परिणामी त्यांचे पाय जमीनीवर असतात हे नक्की
वर्तमान काळात माणसे कितीही मोठे झाले तरी आपण कोण होतो ? कुठे आलो ?या स्वत्वाची जाणिव ज्यांना असते अशी माणसे क्षणिक सुखाने भारावून कधीच जात नसतात.या उलट आपली जबाबदारी आणि कर्तव्य ओळखून चालतात कारण त्यांच्या आयुष्यात राष्ट्रविचार,मानवतावाद तथा पक्ष विचार निष्ठा नसानसांत मुरलेली असते.त्यापैकीच केशवजी अस म्हटल तर चुकिच ठरणार नाही,त्यांचा आज वाढदिवस शुभेच्छा देतांना या माणसाला मागे वळून पाहण्याचा मी प्रयत्न केला.तेंव्हा लक्षात आले की ते मुळचे सोलापूर गावचे रहिवासी,वडिल गिरणी कामगार,लहाणपणा पासून परस्थीतीची जाणीव आणि हलाखीचा अनुभव,महाविद्यालयीन शिक्षण घेताना स्वःताच्या गरजा मर्यादित ठेवून जगताना ABVP संघटनेशी संपर्क आला.तिथेच मग विचारांचा पाया पक्का झाला.तदनंतर भाजपाशी संपर्क येणे साहजिकच थेट मुंबई आणि मागच्या वीस वर्षांपासून पक्षात माध्यमाची वेगवेगळी जबाबदारी.केशवजी म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे यांचे विश्वासू सैनिक हि त्यांची ओळख,नाही म्हटले तरी दहा वर्षांहून अधिक दिवंगत नेते मुंडे साहेबांचा माध्यमकर्मी म्हणून त्यांनी काम केले.पक्षात काम करतांना आनेकांसोबत संबंध आले.पण,सामान्य कार्यकर्ता हि ओळख कधीच पुसू दिली नाही,प्रदेश भाजपाने काढलेल्या संघर्ष यात्रा असो किंवा इतर पक्षीय कार्यक्रम माध्यमाची जबाबदारी चांगली पेलवून काम सिध्द केले,मागच्या अनेक वर्षांपासून प्रवक्ता आता मुख्य प्रवक्ता पदावर यशस्विपणे काम करत आहेत.राज्यात फडणवीस सरकार असताना भक्कम बाजू मांडणारा लढाऊ हे लोकांनी पाहिले.सत्ता नसतांना विरोधकांची भुमिका.पक्षाचे धोरण,घेतलेली बाजू आणि केंद्र सरकाची बाजू प्रभावीपणे जनतेच्या समोर घेवून जातात.राज्यातील सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या प्रवक्त्यांना घाम आणण्याचे कसब अनेकदा चर्चेत जनता पाहत आहे.कोरोना सारख्या संकटात बाजू अगदी तालमीतल्या पहेलवाना सारखी कशी मांडतात हे नेहमीच दिसते.केशवजी यांचा स्वभाव निर्भीड असून ते सुतभर ही निष्ठेला तडा जावू देत नाहीत.आमच्या सारख्या नवीन लोकांना नेहमीच योग्य मार्गदर्शन करत सोबत घेवून चालतात,अभ्यासू आणि चिकित्सक वृत्ती,विनोदी फटकारे मारण्याची सवय आहे.शांत मनमिळवू स्वभाव असून स्वःताचे दुःख झाकून इतरांना आनंदाचा प्रसाद वाटणारे केशवजी यांची वाणी मधूर आहे,तोंडात साखर,डोक्यावर बर्फ ठेवून त्यांच्यावर असलेली जबाबदारी पार पाडतात,कुणावर अन्याय करण्याचा मुळ स्वभावच नाही,पक्ष तथा नेतृत्व विकासासाठी त्यांची नेहमीच धडपड चालू असते,पक्षात त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे यशस्वीपणे पार पाडतात,प्रसार माध्यम,सोशल मिडिया यांच्या सोबत सुसंवाद ठेवून पक्ष तथा नेतृत्वासाठी फायदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो,त्यांचा जनसंपर्क मोठा असून माध्यमांसोबत चांगले संबंध ठेवलेले आहेत.मागचे दिवस आठवून शुद्ध कर्म,परोपकाराने चालणारे केशवजींच्या जिवनात वहिनींचा मोठा वाटा आहे.ज्यामुळे इथपर्यंत मजल गाठण्यात त्यांना यश आले, कुटुंबवत्सल पिता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही,अशा केशवजी यांना शुभेच्छा देतांना तुमच्या हातून भविष्यात यापेक्षा अधिक कार्य घडावे हिच आमची मनोकामना.

शब्दांकन :-
राम कुलकर्णी,राज्य प्रवक्ता,भारतीय जनता पार्टी.