धनगरजवळका गावात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्यात यावे ― नानासाहेब डिडूळ

Last Updated by संपादक

पाटोदा:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील धनगरजवळका येथील रहिवासी नानासाहेब ड़िड़ूळ (पञकार ) यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या कड़े 15 वित्त आयोगातुन सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी अर्जाद्वारे केली आहे .
करोनाचा प्रादुर्भाव वाढल्या कारणाने धनगरजवळका येथे आहील्यादेवी चौक, ग्रामपंचायत कार्यालय परीसर, जि.प.शाळा, ड़ाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हनुमान मंदीर, जगदंबा मंदीर परीसर गावातील इतर चौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी नानासाहेब मोतीराम ड़िड़ूळ (पञकार ) यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकड़े केली आहे.
याचा फायदा सरपंच /ग्रामसेवक यांना होणार आहे. याद्वारे मोबाईल ला अॅटेच करून मोबाईल वर ग्रामपंचायत शिपाई, कॅम्युटर ऑपरेटर, जलसुरक्षक, ग्रामरोजगार सेवक यांच्या वर नियंञण ठेवण्यात येईल, तसेच करोना काळात काहीही काम नसताना बाहेर फिरणारे अलगत कॅमेरात कैद होणार आहेत.

पुर्वी जर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असते तर धनगरजवळका गावातील अनेक चोर्याचा तपास लागला असता .त्याचबरोबर आमच्या घरी झालेली चोरीचा शोध नक्कीच लागला असता .
―सुरेश काळे ( रहिवासी धनगरजवळका )

सी.सी टी.व्ही. कॅमेरा बरोबर गावातल्या नाल्याची साफसफाई आणि कचरा पेट्या सुद्धा चौका-चौकाट ठेवण्यात याव्यात.
―महादेव ड़ोरले ( रहिवासी धनगरजवळका )