पिंपळगाव(हरे) ता.पाचोरा जिल्हा परिषद गटाच्या सदस्यांनी राबविला सोयगाव तालुक्यात उपक्रम
पाचोरा,ता.२६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात कोविड रुग्णांना ऑक्सिजनची टंचाई भासत असतांना मोठ्या भावाच्या निधनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जागी पाच वृक्षांची लागवड करून ऑक्सिजनची उपलब्धतेचा संदेश पिंपळगाव(हरे) ता,पाचोरा जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना दिला आहे.पिंपळगाव(हरे) गटाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर कांटे यांचे गाव सोयगाव तालुक्याच्या हद्दीला घोसला स्गीवरला लागून आहे.त्यांचे मोठे बंधू भागवत काटे यांचे निधन झाल्यावर मधुकर काटे यांनी बंधूच्या निधनानंतर सोयगाव तालुक्याच्या हद्दीत बंधूच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर पाच वृक्षांची लागवड करून सध्या होणार्या ऑक्सिजनची टंचाई भविष्यात दूर व्हावी यासाठी हा उपक्रम सोयगाव हद्दीत राबविला असून नागरिकांना वृक्ष लागवड करून ऑक्सिजन वाढविण्याचा संदेश दिला आहे.या लागवड केलेल्या पाच वृक्षांवर निगराणीसाठी दोन व्यक्तींना निवड करून या वृक्षांची देखभाल करून त्या वृक्षांना पाणी घालून या वृक्षांचे वटवृक्ष करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील सदस्य मधुकर काटे यांच्या मोठे बंधू भागवत काटे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार होताच त्यांच्या सोयगाव हद्दीतील अंत्यसंस्कार झालेल्या जागेवर मधुकर काटे यांनी पाच वृक्षांची लागवड केली या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारीही देण्यात येवून बंधूच्या तिसऱ्याची राख नदीपात्रात न विसर्जित करता त्यांनी या राखेला लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या वाढीसाठी खतपाणी म्हणून घातली आहे.