बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

कोरोना संकटात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करावा ,सत्ताधारी लक्ष घालणार का ? भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा सवाल

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
सध्या कोरोना संकटामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला असून खरीप आणि रब्बी हंगाम अतिवृष्टी मुळे हाती लागला नाही.सोयाबीन धानाला सोन्याचा भाव असला तरी यंदा शेतकऱ्यांचा पदरात काहीच पडलेले नाही,मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी विमा भरलेला असून तो तात्काळ मंजूर करून वाटप करावा अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नावर लक्ष घालण्याची गरज आहे,आमच्या नेत्या पंकजाताई या पालकमंत्री असतांना बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पीक विमा आला याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली आहे.

प्रसिध्दीसाठी दिलेल्या निवेदनात प्रवक्ते कुलकर्णी यांनी म्हटले आहे.की,सध्या कोरोना संकटाचा काळ असून लॉकडाऊन मुळे सर्व व्यवस्था ही ठप्प आहे.मात्र अशाही परिस्थितीत आमचा बळीराजा माञ शेतात राब-राब राबतो,देशाची अर्थव्यवस्था तारणारा शेतकरी आहे.मागच्या वर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणापर झाली,परिणामी खरिपाची पिके हाती लागली नाहीत,शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विमा भरलेला आहे.रब्बी पिके सुध्दा आवकाळी वादळात सापडले,एकूणच काय तर शेतकरी मेटाकुटीला आला असून विमा जर लवकर वाटप झाला तर अशा संकटात मदत झाल्याशिवाय राहणार नाही,खरे तर राज्यात देवेन्द्र फडणवीस सरकार असताना आणि पंकजाताई या पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यासाठी नाही म्हटले तरी दरवर्षी किमान 900 कोटीं पेक्षा जात विमा पदरात पडला.मात्र आज एक वर्ष झाले तरी विम्याची साधी दमडी ही शेतकऱ्यांना मिळत नाही,त्यामुळे
बीड जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नावर विशेष लक्ष घालण्याची गरज आहे,मुळात यंदा विम्यासाठी अनेक अडचणी आलेल्या आहेत,खरिपाचा दुसरा हंगाम तोंडावर आलेला असतांना अद्याप मागच्या वर्षीचा विमा नाही हे दुर्दैव असून कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.बीडचे जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नावर तात्काळ लक्ष घालावे आणि विमा वाटप करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी राम कुलकर्णी यांनी केली आहे.