अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

स्व.शहाजीराव गंभीरे यांच्या पुण्यतिथीनिमीत्त लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयास दिले साहित्य

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील गंभीरे परिवारातील मुलांनी आपले वडील स्व.शहाजीराव गंभीरे यांच्या ६ व्या पुण्यतिथीनिमीत्त बुधवार,दि.२८ एप्रिल रोजी लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयास उपचारासाठी आवश्यक असलेले साहित्य देण्यात आले.अत्यंत साधेपणाने सामाजिक बांधिलकी जोपासत पुण्यतिथी साजरी करून समाजासमोर नवा पायंडा पाडला आहे.

स्व.शहाजीराव गंभीरे यांचा ६ वा पुण्यतिथी कार्यक्रम कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या संचारबंदीमुळे बुधवारी साध्या पध्दतीने करण्यात आला.प्रारंभी स्व.शहाजीराव गंभीरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी सरपंच विद्याताई शहाजीराव गंभीरे,
सरपंच अश्विनीताई विजय गंभीरे,नगरसेविका शिल्पाताई संजय गंभीरे, वंदनाताई दत्ताञय केंद्रे,डॉ.दत्ताञय केंद्रे, प्रशांत गंभीरे,वैजेनाथ गंभीरे,योगेश गंभीरे यांची प्रमुख उपस्थिती होती.सदरील साहित्य डॉ.अरूणा दहिफळे-केंद्रे यांनी स्विकारले.यावेळेस डॉ.कौस्तुभ कुलकर्णी,डॉ.इम्रान सर,योगा शिक्षक शरद मुंडे,इब्राहिम पटेल, ज्ञानेश्वर मगर, अविनाश चोपडे, प्रफुल्ल कोमटवार, जालिंदर तोडकर, राहुल बुरगे हे उपस्थित होते.दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त गंभीरे परिवार हा दरवर्षीच कीर्तन,अन्नदान आदी कार्यक्रम आयोजित करतो.मागील वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गंभीरे परीवाराने शहरातील 51 हून अधिक गरजू कुटुंबांना किराणा व जीवनावश्यक साहित्य वाटप केले होते.त्याच प्रमाणे यावर्षी ही कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या संचारबंदीमुळे सरकारच्या निर्देशांचे पालन करीत आप्तेष्ट, नातेवाईक व मिञ परिवार यांची गर्दी होणार नाही याची पुरेपुर दक्षता घेतली गेली.शासन आदेशाचे कुठेही उल्लंघन होणार नाही यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय गंभीरे यांनी सांगितले. तर प्रतिवर्षी किर्तन कार्यक्रमास भाविकांची मोठी उपस्थिती असते.मात्र, मागील वर्षीपासून कोरोना साथ रोगाचा प्रादुर्भाव होवू नये व प्रतिबंधासाठी लॉकडाऊन आहे.दरम्यानच्या काळात संचारबंदी व समाजहित लक्षात घेता यावर्षी आईच्या सांगण्यावरून लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयास त्यांच्या गरजेनुसार ५ स्टेथोस्कोप,१ हजार फिक्सर आयव्ही कॅश,१ हजार १०० मि.लीच्या सलाईन बॉटल (एन.एस),५०० विक्टोफॉल इंजेक्शन आदी कोविड रूग्णांच्या उपचारासाठी आवश्यक साहित्य देण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे.दरवर्षी होणारा पुण्यतिथीचा मोठा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.शासन सूचनेचे अनुपालन करीत घरच्या घरी फक्त पुजाविधी करण्यात आला अशी माहीती सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे यांनी दिली.


Back to top button