कोविड स्मशानभूमीत शिक्षक मैत्री प्रतिष्ठानने बसविली पाण्याची टाकी -शिक्षक मैञी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा रापतवार यांची माहिती

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
अंबाजोगाई शहरातील सर्व्हे नंबर १७ मध्ये असलेल्या कोविड स्मशानभूमीत मयतांच्या नातेवाईकांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी येथील शिक्षक मैत्री प्रतिष्ठानने पाण्याची टाकी बसविली आहे.अशी माहिती शिक्षक मैञी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा रापतवार यांनी दिली आहे.

शिक्षक मैञी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा रापतवार यांनी याबाबत सांगितले की,प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील एक वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू कुटूंबिय यांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.दिव्यांग बांधवांना सहकार्य करण्यात आले.शासकीय कार्यालयात सॅनिटायझर संयञ व हात धुण्यासाठी पाण्याची टाकी देण्यात आली.परराज्यातील मजूर व कुटूंबिय यांना सर्वोतोपरी मदत करण्यात आली.अटल घन वन प्रकल्पासाठी पुढाकार घेण्यात आला.शिक्षक बांधवांच्या विविध प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच समाजातील विविध घटकांना बांधिलकीतून सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.पुढे बोलताना शिक्षक नेते विजयदादा रापतवार यांनी सांगितले की,अंबाजोगाई शहरामध्ये सध्या अर्ध्या मराठवाड्यातून कोरोना बाधित रूग्ण येथील स्वा.रा.ती आणि लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयात उपचार घेण्यासाठी येत आहेत.त्यामध्ये दुर्दैवाने काही दिवसांच्या अंतराने अंदाजे १० ते १२ जणांचे मृत्यू होत आहेत.या कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांवर अंबाजोगाई शहराबाहेरील सर्वे नंबर १७ या ठिकाणी आरक्षित असलेल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.या स्मशानभूमी मध्ये येणा-या कोरोना बाधित रूग्णांच्या नातेवाईकांना हात,पाय धुण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शिक्षक मैत्री प्रतिष्ठान,अंबाजोगाईच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सदरील कोविड स्मशानभूमी मध्ये ५०० लीटर पाणी साठवणूक करण्याची क्षमता असलेली पाण्याची टाकी बसविण्यात आली.याकामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार,सचिव उमेश नाईक,उपाध्यक्ष अनुरथ बांडे,कोषाध्यक्ष दत्ता देवकते,प्रतिष्ठानचे मार्गदर्शक विष्णू सरवदे,विनायक चव्हाण,वैजेनाथ अंबाड,जगन्नाथ वरपे,गणेश तरके,बाळासाहेब माने,समाधान धिवार,संदीप दरवेशवार,केशव इरळे,महादेव मिसाळ,विष्णू गंगणे इत्यादी शिक्षक बांधवांचे आणि सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ सरवदे,हमीद आबा चौधरी,महेश वेदपाठक इत्यादींचे योगदान लाभले असल्याची माहिती विजयदादा रापतवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

जनतेने प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करावे

====================
जगावर आलेले कोरोना या महामारीचे संकट लवकर दूर होईल,प्रत्येकाने नियमीत मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा,गर्दीत जाणे टाळावे,ञिसुञीचे पालन करावे,समाजातील दानशूर व्यक्ती,संस्था आणि संघटना आदींनी बीड जिल्हा प्रशासन,कोविड रूग्णालय,गरजू कुटूंबिय व व्यक्ती यांना सर्वोतोपरी सहकार्य करावे.

-विजयदादा रापतवार (अध्यक्ष,शिक्षक मैञी प्रतिष्ठान,अंबाजोगाई.)