कर्तव्यदक्ष लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोणी सय्यद मीर येथे विलगीकरण कक्षाची स्थापना

कडा:शेख सिराज(आठवडा विशेष प्रतिनिधी)―
चार दिवसापूर्वीच आमदार सुरेश आण्णा धस यांनी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात कोरोना प्रसार थांबवण्यासाठी मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्याच्या वेळी प्रत्येक गावांमध्ये जाऊन गणनिहाय विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यासंदर्भात सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले होते. त्याला अनुसरून लोणी येथील सर्वच कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आज दिनांक 28 रोजी मातोश्री मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य अशा प्रकारचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा एक मुखी निर्णय घेतला. व त्याचे उद्घाटन आज सायंकाळी पाच वाजता माजी आमदार साहेबराव दरेकर नाना व मतदार संघाचे युवा नेते जयदत्त भाऊ धस तसेच आरोग्य अधिकारी श्रीमती पैठणकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना माजी आमदार दरेकर म्हणाले की कोरोणा महामारी ने जागतिक संकट ओढवलेले आहे. या परिस्थितीमध्ये लोणी गणातील ज्या नागरिकांना कोरोना ची लागण झालेली आहे त्यांना लोणी या ठिकाणी विलगीकरण कक्षामध्ये आणून त्यांना योग्य उपचार देऊन बरे करण्यासाठी लोणी येथील सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो कौतुकास्पद आहे. त्यांच्या या जनसेवेच्या कार्यासाठी मी शुभेच्छा देतो व कुठलीही अडचण आली तर मला फोन करा मी ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिल.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे युवा नेते जयदत्त भाऊ धस यांनी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की लोणी येथील सभेमध्ये आमदार सुरेश आण्णा धस यांनी केलेल्या आवाहनास गावातील पदाधिकारी नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी तातडीने विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी उचललेले पाऊल हे समाजाला दिशा देणारे आहे. निश्चितच या विलगीकरण कक्षांमधून रुग्णांना योग्य अशा प्रकारचे उपचार मिळून ते सुखरूप पणे घरी परत्तील अशी आशा मी बाळगतो. धस कुटुंब सदैव मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहोरात्र जागे आहे. कुठलीही अडचण आल्याच्या नंतर आम्हाला फोन करा आम्ही अर्ध्या रात्री सुद्धा तुमच्या साठी धावून येऊ.
कोरोना विषाणू मूळे संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजलेला असताना समाजातील दानशूर दात्यांनी पुढे येऊन आता आजच्या भयंकर घडीला नागरिकांचे जीव वाचवण्या साठी कार्य करण्याची वेळ आलेली आहे. त्या अनुषंगाने तातडीने विलगीकरण कक्ष स्थापन करून पंचक्रोशीतील व लोणी गणातील सर्व कोरोना बाधित नागरिकांसाठी उचललेले पाऊल हे अभिनंदनीय आहे अशा प्रकारचे मत जयदत्त धस यांनी यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी लोणी चे सरपंच रेनकू बेलेकर पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष वाळके त्याच प्रमाणे डॉक्टर निलेश भांबरे व माजी पंचायत समिती उपसभापती गोपाळ भाऊ रक्ताटे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
या छोटेखानी कार्यक्रमासाठी पिंपळा गावचे सरपंच श्री भवर सर, उपसरपंच रामदास शेंडगे ,महबूब जवान साहेब, साकत चे सरपंच ज्ञानदेव सासवडे, माजी सरपंच बाजीराव वाळके, तलाठी ससाने साहेब, माजी उपसरपंच उद्धव पाटील वाळके,मोहन तात्या झांबरे, डॉक्टर निलेश भांबरे, डॉक्टर भीष्माचार्य थिटे ,डॉक्टर गणेश रक्ताटे, डॉक्टर अमोल नरवडे ,राजेंद्र आबा वाळके, आरोग्य अधिकारी पैठणकर मॅडम, सुरेश धस पतसंस्था चेअरमन निळकंठ रक्ताटे, राजेंद्र दादा चोभे , मातोश्री मंगल कार्यालयाचे संचालक सचिन सासवडे व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.