रामतीर्थ सालेवडगाव येथे मोफत कोव्हिड सेंटर

कडा:शेख सिराज―
आष्टी तालुक्यातील रामतीर्थ सालेवडगाव या ठिकाणी भैरवनाथ विद्यालय सालेवडगाव येथे मा. आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ आणी रामतीर्थ सेवाभावी संस्था सालेवडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत कोव्हिड सेंटर मान्यता मिळाली अशी माहिती सरपंच महादेव डोके यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की दिवसेंदिवस कोरोना रूग्नांची वाढती संख्या यातच उपचार वेळेत न मिलाल्याने गोरगरिब नागरींकाचे बळी जात आहे दवाखान्यात बेड ऊपलब्ध होत नाहीत यातच कोरोना पेशंट दररोज वाढत आहे.ग्रामीण भागातिल नागरिंकाना यांचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे.
बीड जिल्याचे पालकमंत्री मां. धनंजय मुंडे साहेब, आष्टी- पाटोदा- शिरूर चे आ. बाळासाहेब आजबे काका, दौलावडगाव गटाचे जि.प. माजी सदस्य शिवाजीराव डोके यांच्या प्रयत्नाने कोव्हिड सेंटरला मंजुरी मिळाले. असून कोरणा वरील लाख रुपये खर्च वाचावा. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कोव्हीड सेंटरची निर्मिती करण्यात येणार . कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी नाव नोंदणी करावी असे आव्हान सालेवडगाव च्या सरपंच सौ सुप्रिया ताई डोके यांनी केले आहे या कोव्हीड सेंटर वरती रुग्णांना मोफत उपचार आणि जेवण मिळणार. येत्या दोन दिवसात सेंटरचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.